पिंपरी, (प्रतिनिधी) – संजय गांधी योजना समिती चिंचवड विधानसभा, अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड, संजय गांधी योजना विभाग पुणे, मुळशी तहसील कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमानाने ७७५ लाभार्थ्यांना पेंशन पत्र वाटप करण्यात आले.
३४० विधवा महिला, अंध ४०, अपंग ९५, मूकबधिर १०, कर्णबधिर १०, मतिमंद १०, घटस्फोटीत महिला २०, जेष्ठ नागरिक २५० यांना आमदार अश्विनी जगताप व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पेन्शन पत्र वाटप करण्यात आले. दिवंगत आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडल अधिकारी सुरेंद्र जाधव, दिनेश नरवडे, भीमाशंकर बनसोडे, तलाठी कविता पाठक, तलाठी हनुमंत चांदेकर, काळुराम बारणे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सुरेश भोईर,
अभिषेक बारणे, माजी नगरसेविका सविता खुळे, संदीप गाडे, विठ्ठल भोईर, संदीप नखाते, काळूराम नढे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, प्रवीण वाघमोडे, तानाजी बारणे, नेताजी नखाते, गणेश कस्पटे, लक्ष्मण सुतार, डॉ. विष्णू जाधव आदी उपस्थित होते.