पुणे | धरणसाखळीतून विसर्ग सुरूच; खडकवासला क्षेत्रात पुन्हा दमदार वृष्टी
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे या चार धरणातून विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणातून 19 हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
मागील 24 तासात खडकवासला धरणात 31 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर पानशेत धरणात 90 मिमी, वरसगाव धरणात 83 मिमी आणि टेमघर धरणात 186 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
पानशेत धरणातून सहा हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर वरसगाव धरणातून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. टेमघर धरणातून 1 हजार 800 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
वरील तीन धरणातून विसर्ग कायम असल्याने खडकवासला धरणातूनही 19 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 28.16 टीएमसी म्हणजे 96.60 टक्के पाणीसाठा आहे.




