Raj Thackeray : “महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सूरू…”; फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची जळजळीत टीका
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरेसेनेतील फुटीर आमदार- खासदारांना लक्ष्य करत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे हे ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

Raj Thackeray – मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरेसेनेतील फुटीर आमदार- खासदारांना लक्ष्य करत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे हे ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना भाजपलाही लक्ष्य केले. भविष्यात या सगळ्याचे परिणाम भाजपलाही भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते घाणेरडे आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक तयार आहेतच. सध्या जे काही सुरु आहे, त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. उद्या सत्ता गेल्यावर भाजपलाही या गोष्टींचा त्रास होईल.
आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचे, याला मर्यादा आहेत की नाही? ज्या ज्या वेळेला जगात एखाद्या सत्ताधाऱ्याने विरोधकांना संपावले आहे, त्यावेळी त्यांच्यातूनच दुश्मन तयार झाले आहेत. त्यांनीच त्यांना संपवले आहे. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरु झाली आहे. (Raj Thackeray)
तुम्ही बाहेरचे विरोधी पक्ष संपवणे हे सोडून द्या, पण तुमच्यात विरोधक निर्माण झालेत, तुम्हाला त्रास होईल तो तुम्हीही बघून घ्याल. हा जगाचा इतिहास आहे. पत्त्यांचा बंगला असतो ना, तसा भाजप हा उलटा बंगला आहे. सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे, तो एकदा सटकला तर सगळे कोसळून पडेल.
तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा काहीही म्हणा. पण भाजप आज मोदींवर टिकून आहे, बाकीच्यांवरती नाही. आता जे काही राजकारण करत आहात, ते तुमच्याच अंगाशी येणार आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
एसआयआरमुळे ममतांचा पराभव : (Raj Thackeray)

Raj Thackeray : “महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सूरू…”; फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची जळजळीत टीका
बंगालमधून 27 लाख मते काढली गेली. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याचा पराभव होतो, ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी मोठी सरकार यंत्रणा लावली. एसआयआरचा फटका पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुकीत बसला आहे.
सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो. आपण काय पायंडा पाडतो, याचे भान राजकीय पक्षांना नसेल तर, पुढच्या पिढ्यांची चिंता वाटते. राजकारण कुठे नेणार आहोत, याचा विचार करावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.





