Aashadhi Wari : आळंदीत ‘या’ कालावधीत विवाह सोहळ्यांना बंदी; पोलिसांकडून निर्देश जारी
Aashadhi Wari : संशयास्पद हालचाल आढळल्यास '११२' या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

Aashadhi Wari : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी (Aashadhi Wari ) पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीत लाखो वारकऱ्यांची प्रचंड गर्दी होणार आहे. याकरिता माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त येत्या 4 ते 9 जुलै या कालावधीत सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीचे व्यवस्थापन नियंत्रित राहावे, यासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या कालावधीत आळंदीतील धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये विवाह, साखरपुडा यांसारखे कार्यक्रम आयोजित करू नये, अशा स्पष्ट सूचना आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी मंगल कार्यालय मालक व धर्मशाळा व्यवस्थापक यांना दिली आहे. आळंदी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ६ दिवसांच्या कालावधीत सर्व मंगल कार्यालयांमधील विवाह सोहळ्यांना पूर्णपणे बंदी घातली. (Aashadhi Wari)
अतिरिक्त गर्दीचा ताण टाळण्यासाठी निर्णय (Aashadhi Wari)
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलैला आळंदीतून होत असून 9 जुलैला पालखी पुण्याला मार्गस्थ होणार आहे. वाहतुकीचे नियोजन आणि गर्दीचे व्यवस्थापन नियंत्रित राहावे याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे. लग्नकार्यामुळे शहरावर या काळात अतिरिक्त गर्दीचा ताण पडणार आहे. तो टाळण्यासाठी मंगल कार्यालय व धर्मशाळांनी वारी काळात लग्नाचे बुकिंग करू नये, असे सांगण्यात आले आहे. (Aashadhi Wari)
- लग्नकार्यांवर बंदी: ४ ते ९ जुलै या काळात आळंदीतील कोणत्याही मंगल कार्यालयात किंवा धर्मशाळेत विवाह, साखरपुडा किंवा मोठे कौटुंबिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिले आहेत.
- बांधकामे बंद: पालखी सोहळ्याच्या काळात शहरातील सर्व नवीन बांधकामे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- धोकादायक इमारतींवर लक्ष: जुन्या आणि धोकादायक इमारती असलेल्या धर्मशाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम पूर्णपणे टाळण्यास सांगण्यात आले आहे.
- सर्व धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र निवास आणि बंदिस्त स्नानगृहांची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. जेणेकरून मोबाईलद्वारे चित्रीकरण किंवा कोणताही गैरप्रकार घडणार नाही.
- सुरक्षा व्यवस्थेसाठी सर्व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवावी लागणार आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ ‘११२’ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा.

याशिवाय वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी केवळ ताजे आणि दर्जेदार अन्नच देण्यात यावे. तसेच, कचरा धर्मशाळांमध्ये साठवून नंतर नगरपरिषदेच्या घंटागाडीतच टाकावा. पालखी सोहळ्यादरम्यान पाणीपुरवठा आणि टँकरची व्यवस्था पूर्वनियोजितप्रमाणे उपलब्ध राहील, असेही मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत देखील पोलिस, प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. (Aashadhi Wari)
हेही वाचा
Benjamin Netanyahu: “…तर इराणवर पुन्हा हल्ला करू शकतो” ; बेंजामिन नेतान्याहू यांच्या विधानाने गोंधळ





