पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा ”डर्टी पिक्चर”; PSI सोबत विवाहबाह्य संबध, सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत मारण्याचा प्रयत्न

पुणे – पुणे शहरात महिला अत्याचाराच्या रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व्यवस्थेवर अनेक वेळा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. असे असातना आज मात्र कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच महिलेवर अत्याचार करत ठार मारण्याची धक्कादायक घटना पुणे शहरातून समोर आली आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवले त्यानंतर या महिलेस सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
हरीश सुभाष ठाकूर (वय 40) असे सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून ते पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात संबधीत सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातच कर्तव्यावर असणाऱ्या तीस वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या घटनाबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी हरीश सुभाष ठाकूर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे पोलिस दलात काम करतात. 2013 मध्ये त्यांनी फिर्यादी महिला आपल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगितले आणि त्यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत वेळोवेळी त्यांच्यासोबत आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यांच्या पाच वर्षीय मुलासमोर देखील त्याने अनैसर्गिक संबंध ठेवल्याची फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान 2015 मध्ये आरोपी ने नवी मुंबई येथील राहते घरात फिर्यादी वर सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यामध्ये फिर्यादीच्या बोटाला जखम झाली. आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने इतके दिवस पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु लग्नाची नोंदणी करण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.





