‘विघ्नेश्वर मल्टीस्टेट’ बँकेचा संचालकच ‘सायबर ठग’!

पुणे – शेअर मार्केटमधील गुंतणूकीवर जादा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून ज्येष्ठ नागरिकांची 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणुक करणार्या टोळीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
त्यामध्ये वाघोली परिसरातील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को – ऑप बँकेच्या संचालकाचा समावेश आहे. तर दुसरा एकजण या बँकेत टेक्निकल काम करत आहेत. त्यांनी बँकेतील खात्यांचा पैसे मागविण्यासाठी वापर केल. तसेच आलेले पैसे काढून ते नवीन खात्यात टाकून त्याद्वारे युएसडीटी बनवून त्याद्वारे क्रिप्टो करन्सी खरेदीसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे.
गोविंद संजय सूर्यवंशी (वय.22 रा. वाघोली, मुळ रा. हिंगोली) रोहित सुशिल कंबोज (वय.23, रा. वाघोली, मुळ रा. पंजाब), बाबाराव उर्फ ओमकार भवर (वय.22 रा. वाघोली, मुळ रा. हिंगोली), जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय.45,रा. चर्होली, मुळ रा. धारावी, मुंबई) आणि केतन उमेश भिवरे (वय.27, रा. खराडी), निखिल ऊर्फ किशोर जगन्नाथ सावत (वय.32रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 12 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेंमेंटबाबत अनन्या गुप्ता या महिलेने जेष्ठ व्यक्तला संपर्क करुन वेगवेगळ्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये सामिल करुन घेतले. गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून 1 कोटी 60 लाख रुपये वेळोवेळी भरायला सांगून फसवणुक केली होती. याप्रकरणी, सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करीत असताना पुण्यातील वाघोली येथील एका नामांकित बँक खात्यात 17 रोजी 5 लाख 82 हजार चेकद्वारे
काढल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सायबर पोलिसांनी बँक खातेधारक भिवरे याला ताब्यात घेतले. त्याचे बँक खाते, मोबाई क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषन केले असता, गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, ओमकार भवर, जब्बरसिंह पुरोहित यांचा सहभाग असल्याचे दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.
दहा वर्षात 100 कंपन्या निर्माण करण्याचे स्वप्न –
गोविंद सूर्यवंशी हा विघ्नेश्वर मल्टीस्टेट को -ऑप बँकेचा संचालक आहे. तर रोहित कंबोज हा बँकेच्या टेक्निकल कामात काम करत असल्याने त्याचा फायदा घेतला आहे. दोघे बी़ टेक उच्च शिक्षित असून त्यांच्या डिगीव्हेंटरी, वननेस, रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या आहेत. पुढील दहा वर्षात त्यांना तब्बल शंभर कंपन्या निर्माण करायच्या होत्या. सूर्यवंशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असून त्यांनी त्याद्वारे अनेक युएसटीटी आरोपी जब्बरसिंह पुरोहित याला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील बँक खाते बनवुन त्याचा पुरवठा करणारा आरोपी निखिल ऊर्फ किशोर सातव यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक
स्वप्नाली शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कदम, तुषार भोसले, पोलीस हवालदार चव्हाण, संदिप पवार, पोलीस अंमलदार दिनेश मरकड, यादव, नागटिळक, सचिन शिंदे, हवालदार जमदाडे, सोनुने, तसेच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मेमाणे यांनी केली आहे.





