LPG cylinder shortage : “देश एकजूट दिसण्याची सर्वाधिक गरज आहे” – शशी थरूर
एलपीजीच्या कमतरतेमुळे, विशेषतः ग्रामीण भागात लोक लाकूड आणि कोळशाऐवजी गॅस सिलिंडर वापरण्यास सुरुवात करत आहेत.

LPG cylinder shortage – देशाच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या विधानातून पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचा पुरेसा पुरवठा असल्याचे दिसून येत असले तरी, एलपीजीची कमतरता असल्याचे दिसून येते. ही टंचाई ग्रामीण भागात जास्त प्रमाणात परिणाम करत आहे.
जगभर युद्धजन्य स्थिती असताना सर्व भारतीयांची यानिमित्ताने एकजूट दिसण्याची सर्वाधिक गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले आहे.
देशभरात एलपीजी गॅसच्या कमतरतेच्या वृत्तांवर राजकारण तापले आहे. शुक्रवारी संसदेत या मुद्द्याचे पडसाद उमटले. त्यावर थरूर यांनी सरकारधार्जिणी प्रतिक्रिया दिल्याने काॅंग्रेसचे अनेक नेते नाराज झाले आहेत.
थरूर म्हणाले की, एलपीजीच्या कमतरतेमुळे, विशेषतः ग्रामीण भागात लोक लाकूड आणि कोळशाऐवजी गॅस सिलिंडर वापरण्यास सुरुवात करत आहेत. त्यामुळे, जर सिलिंडर सहज उपलब्ध नसतील तर ते लोकांसाठी एक मोठी समस्या बनते. अशा वेळी, देशाने एकत्र येऊन या समस्येवर त्वरित तोडगा काढला पाहिजे जेणेकरून सामान्य लोकांना कोणतीही समस्या येऊ नये.






