Dipika Kakar Hospital : दीपिका कक्कर पुन्हा रुग्णालयात; पती शोएबने दिली हेल्थ अपडेट
Dipika Kakar Hospital : दीपिकाला तब्येतीची काळजी घेण्याचा चाहत्यांचा सल्ला

Dipika Kakar Hospital : टिव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने तिला स्टेज २ चा लिव्हर कॅन्सर असल्याचे गेल्यावर्षी सांगितले होते, तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. तेव्हापासून ती आणि तिचा पती शोएब इब्राहिम संकटातून जात आहेत.
लिव्हरमध्ये दोन नवीन गाठी आढळल्यानंतर दीपिकचे इम्युनोथेरपी सेशन सुरु केले होते. आता दीपिका कक्करची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे. तिच्यावर उपचारांचा एक भाग असलेल्या ‘इन्फ्युजन’ करण्यात आली आहे. याची माहिती दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने आपल्या व्लॉगद्वारे चाहत्यांना दिली आहे. व्लॉगद्वारे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हॉस्पिटलमध्ये गेल्याचे दिसत आहे. Dipika Kakar Hospital
रुग्णालयातून माहिती देताना शोएबने सांगितले की, दीपिकाच्या शरीरातील लोहाची (iron) पातळी थोडी कमी होती, त्यामुळे तिला ‘आयव्ही’द्वारे iron देण्यात आले. गेल्या वेळी आम्हाला पूर्ण रात्र रुग्णालयात राहावे लागले होते. पण यावेळी ‘डे-केअर’ होते म्हणून हे पूर्ण करू शकलो, जेणेकरून आम्ही आज रात्री रुहानकडे घरी पोहोचू.” Dipika Kakar Hospital
दीपिकाने सांगितले की, “सर्व काही ठीक आहे. मला फक्त थोडी चक्कर आल्यासारखे वाटत आहे कारण त्यांनी मला आधी एक औषध दिले होते, ज्यामुळे गुंगी येते. बस एवढंच. बाकी सर्व काही अगदी ठीक आहे. आता दर २०-२१ दिवसांनी हे करावे लागते.” तर व्लॉगच्या शेवटी शोएबने दीपिकाचे इन्फ्युजन यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याचे सांगितले. त्यांच्या व्लॉगवर कमेंट करत अनेकांनी दीपिकाला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा :






