Sunita Ahuja: ‘गोविंदाचे 10 नव्हे 50 अफेअर्स असले तरीही मी त्यांना सोडणार नाही’; सुनीता आहुजांचे वक्तव्य चर्चेत
Sunita Ahuja सुनीता म्हणाल्या, "लोकांनी आधी माझ्या जागी राहून पाहावे, त्यानंतरच माझ्याबद्दल मत व्यक्त करावे. माझ्या आयुष्यात मी काय अनुभवलं आहे, हे इतरांना माहिती नाही. हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे."

Sunita Ahuja: बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja ) पुन्हा एकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आल्या आहेत. नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप: सच या सजा’ मध्ये त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. (Sunita Ahuja)
शोदरम्यान सुनीता आहुजा यांनी पती गोविंदाविषयी बोलताना एक धक्कादायक विधान केले. त्या म्हणाल्या, “माझ्या पतीचे 10 महिलांसोबत अफेअर्स असले तरी मी त्यांना कधीही सोडणार नाही. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यावर प्रेम करत राहीन.” त्यांच्या या वक्तव्यामुळे शोचे सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुख देखील आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. (Sunita Ahuja)
या वादाची सुरुवात शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या शिल्पा शिंदे यांच्या एका प्रश्नामुळे झाली. शिल्पा यांनी सुनीता यांच्या पूर्वीच्या काही विधानांचा उल्लेख करत त्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी सुनीता काहीशा संतापल्या आणि त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. (Sunita Ahuja)
सुनीता म्हणाल्या, “लोकांनी आधी माझ्या जागी राहून पाहावे, त्यानंतरच माझ्याबद्दल मत व्यक्त करावे. माझ्या आयुष्यात मी काय अनुभवलं आहे, हे इतरांना माहिती नाही. हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे.” (Sunita Ahuja)
)
Sunita Ahuja on rumours of Govinda’s affair
यानंतर त्यांनी आणखी ठाम भूमिका घेत म्हणाल्या, “गोविंदा माझे पती आहेत. त्यांचे कितीही अफेअर्स असले, तरी मी त्यांना कधीच सोडणार नाही. माझे त्यांच्यावरचे प्रेम कायम राहील.” (Sunita Ahuja)
शोमधील आणखी एका प्रसंगात सुनीता यांनी स्पर्धक राम कपूर यांच्याकडे शिल्पा शिंदे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, शिल्पा त्यांना मुद्दाम चिडवत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलणे योग्य नाही. (Sunita Ahuja)
रागाच्या भरात सुनीता यांनी असेही म्हटले की, “तो माझा नवरा आहे. त्याचे 50 अफेअर्स असले तरी त्याचा इतरांना काय संबंध? मी त्यांची पत्नी आहे आणि आमच्या नात्याबद्दल बोलण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे शोमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. (Sunita Ahuja)
दरम्यान, ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोचा पहिला सीझन 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या वेळी शोचे सूत्रसंचालन कंगना रणौत यांनी केले होते, तर करण कुंद्रा जेलरच्या भूमिकेत दिसले होते. पहिल्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकी ठरला होता. दुसऱ्या सीझनमध्ये अनेक सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी झाले असून विविध टास्क आणि वादांमुळे हा शो चर्चेत आहे.
सुनीता आहुजा यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या पतीवरील निष्ठेचे कौतुक केले आहे, तर काहींनी त्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, या एका वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.





