Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने खरंच भारतीय संघाला ‘डॉबरमॅन’ म्हटलं का? सत्य जाणून घ्या!

Dinesh Karthik’s Doberman Meme Controversy : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ५ गडी राखून गमावला आहे. या पराभवामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विशेषतः एका व्हिडीओ क्लिप आणि वक्तव्यासंदर्भात चर्चा जोरात सुरू आहे, ज्यामध्ये माजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने भारतीय फलंदाजीच्या मालिकेची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी केल्याचे दिसत आहे. खरोखरच त्यांनी असं म्हटलं का? आणि जर म्हटलं, तर का? चला, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली. संघाकडून केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋषभ पंत यांसारख्या फलंदाजांनी ५ शतकं झळकावली. तरीही संघाला विजय मिळवता आला नाही. याचं कारण ठरलं खालच्या फळीतील फलंदाजांचं पूर्णपणे अपयश. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिकने इंग्लंडच्या स्काय स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीवरील सामन्यानंतरच्या कार्यक्रमात एक मनोरंजक गोष्ट सांगितली, जी आता व्हायरल झाली आहे.
दिनेश कार्तिक नक्की काय म्हणाला होता?
दिनेश कार्तिकने सांगितलं की त्यानी ट्विटरवर एक मीम पाहिली, ज्यामध्ये कोणीतरी भारतीय संघाच्या फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी केली होती. या तुलनेत असं लिहिलं होतं की, “डॉबरमॅनचं डोकं खूप चांगलं असतं, मधलं शरीर ठीकठाक आणि शेपटीच नसते.” याचा थेट संबंध भारतीय फलंदाजीच्या क्रमाशी जोडला गेला. डोकं = यशस्वी, राहुल, गिल यांसारख्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. मधलं शरीर = येथे कामगिरी संमिश्र राहिली; पंतने खरंच धावा केल्या, पण इतर कोणी विशेष कामगिरी केली नाही. शेपटी = म्हणजे संघातील खालच्या क्रमांकाचे फलंदाज, जे पूर्णपणे अपयशी ठरले आणि एकूण फक्त ६५ धावाच करू शकले.
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतने ICC कसोटी क्रमवारीत रचला इतिहास! जे धोनीलाही जमलं नाही, ते करुन दाखवलं





