Digital Education : शिक्षण क्षेत्रामध्ये (Digital Education) जगातल्या सगळ्यात पुढे असणाऱ्या देशांपैकी एक म्हणजे स्वीडन. आता आपण जे डिजिटल शिक्षण बघतो म्हणजे डिजिटल क्लासरूम मुलांच्या हातात वही पेण्याऐवजी टॅबलेट देणं लॅपटॉप देणं,त्यांना येणाऱ्या डिजिटल फ्युचर साठी तयार करणं हे सगळं खरंतर स्वीडनने २००९ मध्ये सुरु केलं होत. पण आपला हा निर्णय चुकीचा होता असं त्यांनी जाहीर केलं आहे. एवढंच नाही तर मुलांच्या हातातून टॅब काढून घेऊन त्यांना परत वही पेन आणि पुस्तक देण्यासाठी (Digital Education) स्वीडन सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकूणच डिजिटल लर्निंगचा आपला प्रयोग अयशस्वी होता असं स्वीडनला लक्षात आलेले आहे. 2009 स्वीडनने एक मोठा निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की आपल्या मुलांना डिजिटल भविष्यासाठी तयार करायचं आणि यासाठी शाळांमधून पुस्तकं हटवून त्या जागी टॅबलेट्स आणायचे सगळं जग डिजिटल होत असताना मुलांनी मागे राहून कस चालेल आणि त्यांना लहानपणापासूनच डिजिटल शिक्षण दिले तर पुढे त्यांना सोप्प जाईल असा सगळा विचार त्यांनी केला होता. Digital Education स्वीडन देश पहिल्यापासूनच शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर राहिलाय. सोबतच श्रीमंत देश असल्यामुळे त्यांना या निर्णयाची अंमल बजावणी करणही सहज शक्य होतं बर या निर्णयामागचा विचारही चांगला होता. इंटरक्टिव्ह लर्निंग होईल,अप टू डेट कंटेंट मिळेल, दरवर्षी नवीन सिलॅबसची पुस्तक छापावी लागणार नाहीत. सो कागद ही वाया जाणार नाही आणि पर्यावरणासाठी ते चांगलं असेल असा सगळा विचार त्यांनी केला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 व्या शतकाच्या डिजिटल युगासाठी तयार असणारी पिढी आपण घडवू असा त्यांचा विचार होता. 2021 म्हणजे दहा – बारा वर्षानंतर या सगळ्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये असं दिसून आलं की चौथीच्या पोरांना धड वाचता येत नाहीये त्यांना वाचलेल समजण्यास अडथळा येतोय आणि हे निकाल गेल्या काही वर्षांपासून सातत्याने खाली खाली जातात शिक्षकांनी अशी तक्रार सुरू केली की मुलांचे लक्षच केंद्रित होत नाही, त्यांची एकाग्रता कमी होत चालली आहे. तर पालकांनी तक्रारी केल्या की मुलं टॅबलेटवर अभ्यास सोडून गेम्स खेळत बसतात याबाबत मग त्यांनी संपूर्ण देशभरात चौकशी केली. त्यावर अभ्यास केला तेव्हा सगळीकडे अशीच परिस्थिती दिसून आली आणि मग २०२२ मध्ये स्वीडनच्या शिक्षण मंत्र्यांनी डिजिटल एज्युकेशनचा हा प्रयोग चुकीचा असल्याचं मान्य केलं. शाळांचे डिजिटायझेशन या प्रयोगाला वैज्ञानिक आधार नव्हता आणि तो मुलांच्या शिक्षणाला हानी पोहोचवत होता असं धाडसी विधान त्यांनी केलं. यानंतर 2023 त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची पाठ्यपुस्तके परत शाळांमध्ये आणली. त्याच्या पुढच्या वर्षी देशाच्या पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटने पहिल्यांदाच मुलांसाठी स्क्रीन टाईम गाईडलाई्स जाहीर केल्या. त्याच वर्षी शाळांच्या लायब्ररीज म्हणजे ग्रंथालय आणखी मोठी करण्यासाठी काही कोटी खर्च करण्यात आले. त्यानंतर 2025 सहा वर्षांखालील मुलांसाठी शाळांमध्ये डिजिटल लर्निंग पूर्णपणे बंद करण्यात आलं आणि आता 2026 त्यांनी देशभरातल्या सगळ्या शाळांमध्ये फोन बॅन केलेत. म्हणजे एकेकाळी स्वतःच मुलांना टॅबलेट वाटण्यापासून ते आता शाळांमध्ये फोनही बॅन करण्यापर्यंतचा प्रवास स्वीडनने केला. आता हे सगळं का झालं? जेव्हा मुलांच्या वाचन कौशल्यावरच परिणाम होऊ लागला तेव्हा स्वीडन सरकारने याबाबत रिसर्च सुरू केला की हे का होतय? त्यात त्यांना लक्षात आलं की एखादी गोष्ट पुस्तकातून वाचणं आणि स्क्रीनवरून वाचणं यात भरपूर फरक आहे. स्क्रीनवर वाचताना डोळ्यांवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे कॉन्संट्रेशन कमी होतं. त्या उलट कागदावर वाचताना माहिती जास्त चांगली लक्षात राहते. याला संशोधक प्रिंट डवांटेज म्हणतात पुस्तकात वाचताना आपण पानं उलटतो शब्दांवर थांबतो आणि मजकुराची रचना समजून घेतो,पॅरेग्राफ कुठे केलाय,एक मुद्दा संपून दुसरा कुठे सुरू केलाय हे सगळं पुस्तकात जास्त नीट समजत. टॅबलेटवर वाचताना आपण स्क्रॉल करत जातो बराचसाचा पार्ट स्कप ही करता येतो म्हणजे माहिती डोळ्यासमोरून जाते पण मेंदूत शिरत नाही आणि त्यामुळे खोलवर विचार होत नाही असं संशोधकांच्या लक्षात आलं. यामुळे फक्त विद्यार्थ्यांच्या वाचनावर किंवा आकलनावर परिणाम होत होता असंही नाही तर त्यांच्या हस्तलेखनावरही खूप वाईट परिणाम झाला. याचं कारण तर अगदी स्पष्ट आहे कीबोर्डवर टाईप करणं सुरू केल्यापासून आपणच नाही का लिहिणं विसरलोय. रिसर्च मध्ये समोर आलं की हाताने लिहिताना मेंदू जास्त ऍक्टिव्ह राहतो आणि माहिती जास्त लक्षात राहते याला कारण म्हणजे हाताने लिहिताना मेंदूला अक्षराची रचना लक्षात ठेवावी लागते हाताची हालचाल नियंत्रित करावी लागते आणि शब्दाचा अर्थही समजून घ्यावा लागतो. टायपिंग करताना यातला बराचसा भाग होतच नाही त्यामुळे शिक्षण घेताना हस्तलेखन ही एक महत्त्वाची पायरी समजली जाते. स्वीडन मधल्या शिक्षकांनी हे नोटीस केलं की मुलं साधं हस्तलेखनही विसरत चालली आहेत. गणित सोडवताना रफ काम करण्याची सवयच मुलांना नाहीये. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन शिक्षणासाठी दिलेला टॅबलेट खरंतर फक्त अभ्यासासाठी वापरला जातो का याच उत्तर नाही असच आहे टॅबलेट उघडला की YouTube सोशल मीडिया यातच भरपूर वेळ जातो, एखादा लेक्चर पाहताना किंवा काही वाचताना मध्येच बोर झालं की लगेच दुसरी विंडो ओपन करून काहीतरी टाईमपास बघायचा ऑप्शन मिळतो. त्यामुळे डिजिटल लर्निंग मुळे कितीतरी विद्यार्थ्यांचे रिझल्ट खराब होत असल्याच दिसत होते. आणखी एक प्रॉब्लेम असाही होता की जेवढ्या स्पीडन सगळ्यांना टॅबलेट देण्यात आले तेवढ्या स्पीडन शिक्षकांच ट्रेनिंगच झालं नाही, ना पालकांना याबाबत काही गाईडलाई्स देण्यात आल्या. त्यामुळे टॅबलेट हे टूल कमी आणि खेळणच जास्त झालं आणि कहर म्हणजे किंडा गार्डन मध्ये म्हणजे सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही टॅबलेटवर शिक्षण सुरू केलं होतं म्हणजे ज्या वयात मुलांनी आजूबाजूच्या गोष्टी पाहून वेगवेगळे अनुभव घेऊन शिकायचं असतं त्या वयात त्यांना स्क्रीन समोर बसवण्यात आलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून एक अशी पिढी तयार झाली ज्यांना ना धड लिहिता येतय ना धड वाचता येतंय. म्हणजे सुशिक्षित असण्याच्या च्या व्याख्येतील मूलभूत गोष्ट लिहिता वाचता येणं तीच नीट नव्हती. डिजिटल शिक्षणाचे किंवा आपण असं म्हणू की एकदम लहान वयात किंवा प्राथमिक लेवलला डिजिटल शिक्षणाचे असे तोटे लक्षात घेणारा स्वीडन हा एकमेव देश नाहीये. नॉर्वे आणि डेनमार्क मध्ये देखील शाळांमध्ये किती स्क्रीन टाईम असावा याबाबत अभ्यास सुरू आहे. दक्षिण कोरियामध्ये लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम एक्सपोजर कमी करण्यासाठीच्या गाईडलाई्स दिलेत. ऑस्ट्रियामध्ये आठवीपर्यंतच्या मुलांसाठी मोबाईलबंदी लागू केली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही शाळांमध्ये फोन बॅन करण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि भारतातही लहान मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत गाईडलाई्सचा विचार सुरू आहे. मात्र शाळांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात डिजिटल शिक्षण लॅपटॉप टॅबलेट वाटप हे सगळं सुरू आहे. अर्थात हे चुकीचं नाहीये पण स्वीडन कडून थोडा धडा घ्यायला हवा. खरी गंमत अशी आहे की ज्या देशांमध्ये खूप आधीपासून डिजिटल शिक्षण सुरू झालं होतं त्यांना आता त्याचे तोटे दिसू लागले आणि ते परत पुस्तकांकडे वळताना दिसत आहेत.ज्या देशांमध्ये डिजिटल शिक्षण नुकतच सुरू झालंय ते मात्र त्याच भरभरून कौतुक करत आहेत. खरं तर डिजिटल लर्निंग ही वाईट गोष्ट नाही मात्र डिजिटल टूल्स (Digital Education) हे नेहमीच्या शिक्षणाला पूरक म्हणून वापरले पाहिजेत ना की रिप्लेसमेंट म्हणून यासाठी सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे मुलं लहान असताना म्हणजे नर्सरी किंडा गार्डन प्रायमरी अशा स्तरांवर डिजिटल पूर्णपणे नाकारून हाताले लिहिणं आणि पुस्तक वाचणं यावर भर द्यायला हवा. यानंतर जसं जसं हायर एज्युकेशन येईल किंवा मग या स्किल्स नीट जमतायत हे लक्षात येईल त्यानंतर डिजिटलचा टप्प्याटप्प्याने किंवा ठराविक गोष्टींसाठी वापर करणं सुरू करावं. टेक्नॉलॉजी वाईट नाहीये पण योग्य वयात,योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरली तर त्याचा फायदा करून घेता येऊ शकतो.