तेजस्वीसाठी अनुष्काला सोडलं? ट्रोल करणाऱ्यांना करण कुंद्राचे सडेतोड उत्तर

Karan Kundra | अभिनेता करण कुंद्रा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. अनुषा दांडेकरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’मध्ये एकत्र झळकले होते. तिथेच त्यांचे सूर जुळले आणि तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र त्यांच्याही ब्रेकअपच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या.
इतकेच काय तर तेजस्वीसाठी अनुषाला फसवलं अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यावर आता त्याने पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. करणने त्याने त्याच्या संदर्भातील सर्व बातम्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. यात तेजस्वी आणि त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा, तेजस्वीसाठीच अनुषाला सोडल्याची बातमी आहे.
त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “अजून पैसे लावा माझ्या शुभचिंतकानो, याने तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते कधीच होणार नाही.” पुढे त्याने लिहिले की, “या लोकांसाठी एक गो फंड मी सुरु करण्याचा माझा विचार करतोय. बिचारे कमी बजेट वाल्या पेजेसलाच पैसे देत आहेत.”
Thinking of setting up a gofundme for these people bechare low budget pages ko hi pay kar pa rahein hain.. #sad
— Karan Kundrra (@kkundrra) July 2, 2025
दरम्यान, करण आणि तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’ सीझन १५ मध्ये एकत्र झळकले होते, तर तेजस्वी या पर्वाची विजेती ठरली होती. याशोमध्येच त्यांचे प्रेम बहरले, यानंतर अनेकदा करण तेजस्वीच्या कुटुंबीयांसह उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दोघे एकत्र सण साजरा करतानाही दिसले. सोशल मीडियावर दोघांचे फोटो तुफान व्हायरल होतात.
करण कुंद्राच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर करणने हिंदीतील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकताच तो ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमात झळकला होता.
हेही वाचा:





