‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये जुन्या कलाकरांची एन्ट्री; ‘या’ कलाकारांचे व्हिडीओ समोर

Laughter Chefs 2 | ‘लाफ्टर शेफ्स’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘लाफ्टर शेफ्स २’ देखील काही नवी कलाकरांसोबत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अलीकडेच अब्दु रोजिक आणि मन्रारा चोप्राने हा शो सोडला आहे. त्यानंतर आता या शोमध्ये जुन्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे.
काही दिवसांपूर्वी अब्दु रोजिकच्या जागी करण कुंद्राची एन्ट्री झाली. आता मन्नारा चोप्राची जागा निया शर्माने घेतली आहे. करण कुंद्रा व निया शर्मानंतरही ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये आणखी दोन जुन्या कलाकारांची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे.
अली गोनी ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये पुन्हा पाहायला मिळणार असून त्याने येताच स्टार जिंकला आहे. अली गोनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अली गोनी आणि राहुल वैद्य पापाराझींना पोज देताना दिसत आहे. Laughter Chefs 2 |
View this post on Instagram
याशिवाय ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये रीम शेखचं देखील पुनरागमन झालं आहे. तिचा सेटवरील व्हिडीओ समोर आला आहे. यंदा ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये रुबीना दिलैक, एल्विश यादव, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अब्दु रोजिक हे सहा नवे कलाकार पाहायला मिळाले. Laughter Chefs 2 |
हेही वाचा:





