भूषण प्रधान करतोय अनुषा दांडेकरला डेट? फोटोमुळे चर्चांना उधाण

Entertainment : मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान अभिनयासह त्याच्या हँडसम लुकमुळे सर्वाधिक ओळखला जातो. तरुणीही त्याच्यावर घायाळ होतात. यापूर्वी भूषणचे नाव अभिनेत्री पूजा सावंत हिच्यासोबत जोडले गेले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या रिलेशनशिपची घोषणा केली. त्यानंतर भूषण फरहान अख्तरची मेहुणी अभिनेत्री अनुषा दांडेकर हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. भूषणने सोशल मीडियावर अनुषासोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर अनुषा आणि भूषणच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या.
अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबतचे काही फोटो भूषणने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, शिवाय त्याने तिला रोमॅंटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात. भूषणच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत ‘तुम्ही दोघं डेट करत आहात का?’ असे प्रश्न अनेक युजर्सनी विचारले आहेत. तर काहींनी दोघांना लग्न करण्याचा देखील सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
भूषणने 11 जानेवारी रोजी अनुषाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली होती.यावरूनच त्यांच्या डेटींगच्या चर्चा रंगल्या आहेत. यापूर्वीही दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दरम्यान, अनुषा आणि भूषण लवकरच एका महेश मांजरेकरांच्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अनुषा यापूर्वी करण कुंद्राबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. मात्र पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. सध्या करण कुंद्रा अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.





