करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात?

Tejasswi – Karan Get Married Soon | अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघे बिग बॉस १५ च्या घरात भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. चाहते देखील त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सेलिब्रिटी मास्टरशेफच्या शोमध्ये तेजस्वीच्या आईला फराह खानने तेजस्वीच्या लग्नाबद्दल विचारले. यावेळी तेजस्वीने आयुष्यातील कठीण काळातील अनुभव देखील शेअर केला आहे.
फराहने “शादी कब होगी?” असा प्रश्न तेजस्वीच्या आईला विचारला. त्यावर, अभिनेत्रीच्या आईने याच वर्षी तेजस्वी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर फराह खानने तेजस्वी प्रकाशचे अभिनंदन केले, तर अभिनेत्री लाजून म्हणाली, “असं काही नाही.” तेजस्वी प्रकाशने करण कुंद्रासोबत कोर्ट मॅरेज करण्याचे संकेत दिल्यानंतर काही दिवसांनी हे घडले.
तेजस्वीने शोमध्ये आईच्या संघर्षाबद्दलही सांगितले. वडील आम्हाला सोडून परदेशात गेल्यानंतर तिचा आणि तिच्या भावाचा आईने एकटीनेच सांभाळ केला. हे ऐकल्यानंतर तेजस्वीची आईही भावूक झाली. अलिकडेच, करणनेही सेलिब्रिटी मास्टरशेफमध्येही तेजस्वीच्या कामाचे कौतुक केले आणि सांगितले की शोचे स्वरूप खूप कठीण असले तरी, तेजस्वी तिचे उत्तम प्रयत्न करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.
करण आणि तेजस्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि त्यांचे क्यूट फोटो सतत पोस्ट करत असतात. त्यांच्या फोटोवर चाहत्यांकडूनही लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होतो.
हेही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा ; संघ अन् भाजपच्या संबंधांसाठी किती महत्त्वाचा? ; वाचा सविस्तर





