Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर देशातील राजकारण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घडामोडीवर संशय व्यक्त केला आहे.

Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर देशातील राजकारण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घडामोडीवर संशय व्यक्त केला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी खरोखर राजीनामा दिला आहे की फक्त खातेबदल झाला आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे,” असे विधान त्यांनी करत नव्या चर्चांना तोंड फोडले. (Dharmendra Pradhan)
मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचे अभिनंदन करत, “या आंदोलनाने देशातील तरुणांना भयाच्या छायेतून बाहेर काढले,” असे मत व्यक्त केले. (Dharmendra Pradhan)
यावेळी केंद्र सरकारवर टीका करत ठाकरे म्हणाले, “देशातील जनतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता. पण युवा शक्ती एकत्र आली तर सरकारलाही झुकावे लागते. केवळ सत्तेत आहात म्हणून अहंकार बाळगू नका.” त्यांनी आंदोलनाच्या परिणामांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केले. (Dharmendra Pradhan)
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे प्रधान यांचा राजीनामा होती. ती मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी प्रत्यक्षात राजीनामा दिला आहे की त्यांचा फक्त खातेबदल झाला आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Dharmendra Pradhan)
दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे यांनी 26 जुलै रोजी मुंबईत आयोजित मोर्चा आता ‘विजयी रॅली’ असेल, असे जाहीर केले आहे. या रॅलीत ठाकरे बंधू नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. (Dharmendra Pradhan)






