भाजपने मित्रपक्षाचे वाढवलं टेन्शन? दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत वाद असतानाच बड्या नेत्यांवर सोपवली जबाबदारी

Maharashtra Politics | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू आहे. यातच भाजपने मित्रपक्षाचे पालकमंत्री असलेल्या ठिकाणी संपर्कमंत्र्यांची समांतर यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्रिपद आहे. याच १७ जिल्ह्यांसाठी भाजपनं संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. सरकारसोबतच्या समन्वयासाठी या नेत्यांची नेमणूक करत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. रायगडसाठीही भाजपनं संपर्कमंत्री जाहीर केला आहे. आशिष शेलार यांच्याकडे भाजपनं रायगडचं संपर्कमंत्रिपद दिलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा पेच कायम असताना भाजपनं जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री जाहीर केला आहे. Maharashtra Politics |
महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे 9 जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 जिल्ह्यात मंत्री आहेत. या जिल्ह्यात आता त्या ठिकाणी संपर्क मंत्रिपदाची नेमणूक केली आहे. त्यामुळे या ठिकाणी येत्या काळात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भाजपचे सर्वच बाबीवर लक्ष असणार आहे. मित्रपक्षांवर वरचढ ठरण्यासाठी भाजप संपर्क मंत्रिपदाच्या माध्यमातून खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या निर्णयावरून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. Maharashtra Politics |
भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक
दरम्यान, महाडचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. जिल्ह्यातील सेनेचे अन्य आमदारही त्यांच्याच नावासाठी आग्रही आहेत. असं असताना रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना देण्यात आलं. त्यानंतर शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत आपला निषेध व्यक्त केला. Maharashtra Politics |
कोणा-कोणाला दिली संपर्क मंत्रिपद म्हणून जबाबदारी ?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, मुंबई शहराचे पालकमंत्रिपद आहे. भाजपने ठाण्याची जबाबदारी गणेश नाईक आणि मुंबई शहरची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, बीडचे पालकमंत्रिपद आहे. भाजपने पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याकडे संपर्क मंत्रिपद दिले आहे. तर बीडमध्ये जबाबदारी पंकजा मुंडेंकडे दिलेली आहे
गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील पालकमंत्री असून याठिकाणी भाजपचे पंकज भोयर संपर्कमंत्री असणार आहेत. तर बुलढाणा येथे राष्ट्रवादीचे मकरंद पाटील पालकमंत्री आणि आकाश फुंडकर हे संपर्कमंत्री, तर यवतमाळमध्ये शिवसेनेचे संजय राठोड पालकमंत्री आणि अशोक उईके संपर्कमंत्री, वाशिममध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पालकमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील संपर्कमंत्री, संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या सोबतीला अतुल सावे असणार आहेत. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्या सोबत जयकुमार गोरे, हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांच्या सोबत मेघना बोर्डीकर असणार आहेत.
सातारामध्ये शिवसेनेच्या शंभूराज देसाईसोबत शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरसोबत माधुरी मिसाळ , जळगावमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, नंदूरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटे यांच्यासोबत जयकुमार रावल, रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे सोबत आशिष शेलार तर रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्यासोबत निलेश राणे असणार आहेत.
हेही वाचा :





