Sarah Arjuna : धुरंधर चित्रपटाने मोठा इतिहास रचला. या चित्रपटाने २०२५ या वर्षात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांचे रेकॅार्ड मोडले. चित्रपटात रेहमान डेकैतच्या भूमिकेत अक्षय खन्नाच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. यासोबत इतरही कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. या चित्रपटात अभिनेत्री सारा अर्जुनच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. अशातच अभिनेत्री सारा अर्जुनने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक महत्त्वाचा संदेश चाहत्यांसाठी जारी केला आहे, ज्यामध्ये तिने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धुरंधरमुळे सारा अर्जुनला मोठी लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या सर्व चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा सर्वांना सुप्रभात आणि सर्वांना महाशुवरात्रीच्या शुभेच्छा.” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच या पोस्टमध्ये साराने एक महत्वाचा संदेश चाहत्यांना दिला आहे. सारा अर्जुनने इंस्टाग्राम स्टोरीवर ती ट्विटरवर सक्रिय नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मला फक्त काही महत्त्वाची माहिती शेअर करायची होती. मी ट्विटरवर नाही.” असे ती म्हणाली आहे. जर तुम्हाला माझ्या नावाने कोणत्याही हँडलवरून कोणतेही ट्विट किंवा विधान दिसले तर कृपया समजून घ्या की ते मी केलेले नाही. असे तिने म्हटले आहे. अभिनेत्री सारा अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तिने धुरंधर चित्रपटात महत्वाची भूमिका साकारलेली आहे. आगामी काळात काही चित्रपटात ती दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या प्रोजेक्टविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा २०२५ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट धुरंधरचा सिक्वेल आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे. हेही वाचा : Hingoli News : बम बम भोले!!! महाशिवरात्रीच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे भाविकांची मोठी गर्दी