शिवशंकर निरगूडे Hingoli News : हिंगोलीच्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथाचा मंदिर परिसर महाशिवरात्री निमित्ताने भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला. राज्यासह परराज्यातील हजारो भाविकांनी ‘बम बम भोले’, ‘श्री नागनाथ महाराज की जय’चा जयघोष करत दर्शन घेतले. परिसरातील अनेक भाविक अनवाणी मंदिरामध्ये दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक महाशिवरात्रीनिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस दुधअभिषेक करून महापूजा केली कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर सपत्नीक यांच्या हस्ते रविवारी मध्यरात्रीनंतर प्रभू नागनाथास दुग्धाभिषेक करून महापूजा केली. Harshvardhan Sapkal : टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणे भोवलं; हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल महापूजेनंतर मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. नागनाथ मंदिर फुलांनी सजविण्यात आले. तसेच नागनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव …बम बम बोले’चा गजर करत भाविकांनी नागनाथ प्रभू चे दर्शन घेतले. Santosh Bangar विविध कार्यक्रमाचे आयोजन औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीला रात्री भक्तनिवास, पार्किंग परिसरात लेझर शो होणार असून यामध्ये तब्बल 200 ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यामध्ये मंदिराची प्रतिकृती, नागनाथांची पिंड, शंकर- पार्वती यांची मूर्ती तयार केली जाणार असून मंदिराचे महत्त्व, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा केलेला जीर्णोद्धार आदी माहिती दिली जाणार आहे. Rinku Rajguru : अथांग समुद्र अन्…; ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त रिंकू राजगुरूचा लाल साडीतील खास अंदाज जमिनीपासून सुमारे 150मीटर उंच आकाशात हा लेझर शो सादर केला जाणार आहे. परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरून हा शो पाहता येईल. वीस ते तीस मिनिटांच्या शोसाठी व्हीआयपी स्टेज तयार करण्यात आले आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या पश्चिम द्वारातून प्रवेश दिला जाणार आहे त्या ठिकाणावरून दर्शनासाठी सुमारे तीन तासांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. याशिवाय भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी अभिषेक पूजा बंद केली जाणार आहे. नागनाथ महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 25 क्विंटल खिचडीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. त्यानंतर रात्री ७ वाजता नागनाथाची पालखी निघेल आणि शहरातील रावळेश्वरांच्या मंदिरातून पालखी परत नागनाथ मंदिरात येईल. मंदिर परिसरात 100 सीसीटीव्हीचा वॉच औंढा नागनाथ येथील यात्रेनिमित्त दोन लाखापेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे, त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने दोन ठिकाणी पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय परिसरात 100 सीसीटीव्ही बसवले आहेत त्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. हेही वाचा: Rinku Rajguru : अथांग समुद्र अन्…; ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त रिंकू राजगुरूचा लाल साडीतील खास अंदाज