Accident News : मोठी बातमी..! कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर
Accident News : छत्तीसगडचे वनमंत्री केदार कश्यप यांच्या ताफ्याला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Accident News : कोंडागावमध्ये राज्याचे वनमंत्री केदार कश्यप यांच्या ताफ्याचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात मंत्री केदार कश्यप बचावले. मात्र, ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनाचे मोठे नुकसान झाले असून मंत्र्यांचे पीए आणि पोलिस जवानांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, केदार कश्यप यांचा ताफा फरसागुडा येथून कोंडागावच्या दिशेने जात होता. जुनवानी परिसरात समोरून आलेल्या भरधाव कारने प्रथम मंत्र्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर तीच कार ताफ्यात मागून येणाऱ्या फॉलो वाहनावर जाऊन आदळली. (Accident News)
एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर
धडक इतकी जोरदार होती की ताफ्यातील वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. जखमींना तातडीने कोंडागाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Accident News)
मंत्री केदार कश्यप यांचे पीए अनुराग शर्मा यांच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याची माहिती आहे. तर चालक सुनील कुमार मौर्य यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. (Accident News)
दोघांना रायपूरला हलवलं
प्राथमिक उपचारानंतर अनुराग शर्मा आणि सुनील कुमार मौर्य यांना पुढील उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले आहे. सुरक्षारक्षक राजेश नेताम यांच्या डोक्यालाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Accident News)
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरधाव कार नेमकी कोणत्या परिस्थितीत ताफ्यावर आदळली, याचा तपास सुरू आहे. कारचालकाची चौकशी केली जात असून अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. (Accident News)





