Paris Paralympics 2024 : भारताच्या हरविंदर सिंगचा तिरंदाजीत ऐतिहासिक ‘सुवर्ण’वेध….

Paris Paralympics 2024 (Archery, Men’s Individual Recurve Open Final) :- भारताच्या हरविंदर सिंगने पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा सहज पराभव केला आहे. भारतीय खेळाडूने हा सामना 28-24, 28-27, 29-25 अशा सरळ सेटमध्ये जिंकून इतिहास रचला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे हे चौथे सुवर्ण आणि एकूण 22 वे पदक आहे. भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 11 कांस्यपदके जिंकली आहेत.
𝗖𝗵𝗮𝗸 D𝗲 Ph𝗮𝘁𝘁𝗲, G𝗼𝗹𝗱 A𝗮 G𝘆𝗮 Ji🥳
Result Update: #ParaArchery🏹 Men’s Individual Recurve Open Final👇🏻
The man-in-form @ArcherHarvinder created history by becoming the first and only #Archer from India🇮🇳 to clinch a #Gold medal🥇at the #Paralympics or the… pic.twitter.com/2CyfdVBbh7
— SAI Media (@Media_SAI) September 4, 2024
हरविंदर सिंग आता पॅरालिम्पिकच्या इतिहासात तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही नवा विक्रम केला होता. त्यावेळी, पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदक (कांस्य) जिंकणारा तो पहिला तिरंदाज ठरला होता. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील तिरंदाजीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
असा होता हरविंदरचा फायनलपर्यंतचा प्रवास..
हरविंदर सिंगने चायनीज तैपेईच्या त्सेंग लुंग हुईचा 7-3 असा पराभव केल्यानंतर उप-उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या सेटियावानचा 6-2 असा पराभव केला होता. त्यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या हेक्टर ज्युलिओ रामिरेझचा 6-2 असा पराभव केला. त्यानंतर हरविंदरने उपांत्य फेरीत इराणी प्रतिस्पर्धी मोहम्मद रेझा अरब अमेरी याचा 7-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.





