Dhamani Jatra 2026 : धामणीत भंडाऱ्याची उधळण! ‘यळकोट यळकोट’च्या जयघोषात खंडोबाची यात्रा उत्साहात
Dhamani Jatra 2026 : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे म्हाळसाकांत खंडोबा देवाचा वार्षिक जत्रौत्सव मोठ्या थाटात; खेड, जुन्नर, शिरूर आणि पारनेरमधील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल.

Dhamani Jatra 2026 – सदानंदाचा यळकोट यळकोटचा जयघोष व भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करित नवसपूर्तीच्या बैलगाडा शर्यतीचा आंनद लुटून जिल्ह्यातील हजारो भाविकांनी आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील म्हाळसाकांत खंडोबा देवाचे रांगेत उभे राहून दर्शन घेतले.पुणे जिल्ह्यातील खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरुर, हवेली,पारनेर,संगमनेर आदी तालुक्यातील भाविक या यात्रेला आले होते. लाखो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.
तळी भंडाराची उधळण करुन नवसपूर्तीची जागर गोधळणे घालण्यात आली. भाविकांनी यात्रेच्या घाटातून नवसाचे बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटला.यात्रेत भाविकांनी जिलेबी,भजी, शेव रेवडीचा स्वाद घेतला. या यात्रेमधील जिलेबी,भजीची चव वेगळीच असते. लहान मुलांनी पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी केली एका दिवसात अंदाजे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली.
मुंबई,पुणे व अन्य शहरात नोकरी आणि व्यावसायिकानिमित्ताने बाहेर असलेले चाकरमानी आपल्या कुटुंबासह व मित्रमंडळीसह यात्रेला हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटला.यात्रेनिमित्त उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली व पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नयेत यासाठी दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले होते. या यात्रेतील बंदोबस्त ठेवण्यासाठी ४ पोलीस अधिकारी, ५० पोलीस अंमलदार उपस्थित होते.म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानच्या वतीने व सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी यात्रेची व्यवस्था पाहिली.आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा पुरवल्या होत्या.
यात्रकरूंनी घेतला मिठाइचा आनंद
शहरात नोकरी निमित्ताने असलेल्या चाकरमानी व भाविकांनी नवसाच्या बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटून जिलेबी,भजी , शेव, रेवडीचा स्वाद घेतला. लहान मुलांनी पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला. शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी केली.




