Virat Kohli retirement : विराटचा उल्लेख करत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज

Ind-Pak Ceasefire and Operation Sindoor Briefing : गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक दरम्यान चाललेला तणाव आता जवळपास कमी झाला आहे. आता दोन्ही देशांच्या सीमांवर शांतता दिसत आहे. कारण काल रात्री कोणताही गोळीबार झाला नाही. याच पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्त्वाची माहिती दिली.
आमचे युद्ध दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरुद्ध – अर मार्शल ए.के. भारती
यावेळी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला आणि भारत-पाक तणावाचे प्रकरण क्रिकेटच्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, “आमचे युद्ध दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरुद्ध आहे. त्यामुळे आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. परंतु पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन दिले आणि त्यांनी ही लढाई स्वतःची बनवली, म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते.” यानंतर लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पुढील माहिती दिली.
मी बीएसएफच्या योगदानाचे विशेष कौतुक करतो – लेफ्टनंट जनरल राजीव घई
#WATCH | Delhi | #OperationSindoor | Air Marshal AK Bharti says, “…This was a different kind of warfare and is bound to happen. God forbid, but if we fight another war, that would be completely different from this one. It is a cat-and-mouse game, and we need to be ahead of the… pic.twitter.com/AJTZ3zQrv2
— ANI (@ANI) May 12, 2025
राजीव घई म्हणाले, “हवाई संरक्षण कारवाईचा संदर्भ समजून घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही आधीच सर्व तयारी पूर्ण केली होती, त्यानंतरच कारवाईला सुरुवात झाली. पाकिस्तानने ड्रोन आणि शस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. उर्वरित ड्रोन पाडण्यात आम्ही यशस्वी झालो. मी बीएसएफच्या योगदानाचे विशेष कौतुक करतो. रक्षकांनी आमच्या मोहिमेत सहभाग घेऊन धैर्याने साथ दिली, ज्यामुळे पाकिस्तानच्या कुटील योजनांना खीळ बसली. ‘जब हौसलें बुलंद हों, तो मंजिलें भी कदम चूमती हैं’.
हेही वाचा – Virat Kohli Retirement : सिंहासारखा उत्साह असलेला माणूस…! किंग कोहलीला गंभीर, शाह यांचा भावनिक सलाम
विराट माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक – राजीव घई
#WATCH | Delhi | DGMO Lieutenant General Rajiv Ghai says, “Targetting our airfields and logistics is way too tough… I saw that Virat Kohli has just retired from test cricket; he is one of my favourites. In the 1970s, during the Ashes between Australia and England, two… pic.twitter.com/B3egs6IeOA
— ANI (@ANI) May 12, 2025
लेफ्टनंट जनरल राजीव घई पुढे म्हणाले की, ‘कदाचित आज आपण क्रिकेटबद्दलही बोलले पाहिजे. कारण आज मी पाहिले की विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. आपल्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे खूप कठीण आहे.’ त्यांनी हे संपूर्ण प्रकरण क्रिकेटच्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की ७० च्या दशकात अॅशेस चालू होती. ऑस्ट्रेलियाचे दोन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन आणि डेनिस लिली यांची मालिकेत दहशत होती.
हेही वाचा – Virat Kohli Retirement : रोहितनंतर विराट कोहलीचीही कसोटीतून निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट केली शेअर
ग्रिड सिस्टीममधील एक थर तरी शत्रूंना नक्की पाडेल – राजीव घई
राजीव घई पुढे म्हणाले, ‘त्या दोन गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी लाइनअप उद्ध्वस्त केली होती आणि मग ऑस्ट्रेलियाने एक म्हण मांडली. ‘Ashes to ashes, dust to dust, if Thommo don’t get ya, Lillee must’ याचा अर्थ असा की जर थॉमो तुला आऊट करु शकला नाही तर लिली तुम्हाला नक्कीच आऊट करेल. जर तुम्ही या थरांकडे पाहिले तर तुम्हाला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे ते समजेल. जरी शत्रू सर्व थरांमधून जाण्यात यशस्वी झाला, तरीही या ग्रिड सिस्टीममधील एक थर त्यांना नक्की पाडेल.





