Virat Kohli : ‘सर, तुम्ही चुकीचं केलं, निवृत्ती का घेतली?’; चाहत्याचा विराटला सवाल, VIDEO होतोय व्हायरल

Virat Kohli’s video viral after test retirement : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३६ वर्षीय विराट कोहलीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. विराट कोहलीने त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या कारकीर्दीत टीम इंडियासाठी अनेक मोठे विक्रम केले आहेत. विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीमुळे रेड बॉल क्रिकेटमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. म्हणूनच त्याच्या निर्णयावर चाहते अत्यंत निराश आहेत.
कसोटी निवृत्तीनंतर विराटचा व्हिडीओ व्हायरल –
अशात आता विराट आणि त्याच्या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कसोटी निवृत्तीनंतर, विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह प्रेमानंद जी महाराजांच्या दरबारात वृंदावनला पोहोचला. यानंतर, जेव्हा तो मुंबईत परतला तेव्हा विमानतळावर चाहत्यांची गर्दी जमली होती. विराट त्याची पत्नी अनुष्कासोबत गाडीकडे चालत होता.
View this post on Instagram
निवृत्ती का घेतली? चाहत्याचा विराटला सवाल –
त्यावेळी एक चाहता विराटला म्हणाला की, ‘सर, तुम्ही चुकीचं केलं, तुम्ही निवृत्ती का घेतली? आता मी क्रिकेट पाहणार नाही. मी तुमच्यासाठी कसोटी सामने पाहायचो. सर, आम्ही एकदिवसीय सामन्यात तुमची वाट पाहू. मी फक्त एकदिवसीय सामना पाहेन.’ विराटच्या या चाहत्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Yograj Singh : ‘ते अजून खेळू शकले असते, पण…’, रोहित-विराटच्या निवृत्तीवर योगराज सिंग यांच मोठं वक्तव्य
आयपीएल २०२५ साठी विराट बंगळुरूला रवाना –
Virat Kohli and Anushka Sharma in Mumbai 😍pic.twitter.com/obVCkvfGaw
— Digital मारवाड़ी (@digital_marwadi) May 13, 2025
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली सध्या पूर्णपणे आयपीएलवर लक्ष केंद्रित करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. पण, आता स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होत आहे. आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला सामना १७ मे रोजी आरसीबी आणि केकेआर यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी विराट कोहली बंगळुरूला रवाना झाला.
आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ –
आयपीएल २०२५ मध्ये, आरसीबी संघ शानदार कामगिरी करत आहे. आरसीबीने आतापर्यंत स्पर्धेत एकूण ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी ८ सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, १६ गुणांसह, आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे. अशा परिस्थितीत, जर आरसीबीने केकेआर विरुद्धचा सामना जिंकला, तर तो या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनेल.





