Virat Kohli : ‘त्याने भारतीय क्रिकेटची संस्कृती बदलली…’, विराटच्या कसोटी निवृत्तीनंतर बालपणीच्या कोचचे वक्तव्य

पीटीआयशी बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले, “कसोटी क्रिकेटला निरोप देऊन त्याने एक आदर्श ठेवला आहे. आपण अनेकदा पाहिले आहे की आपल्या क्रिकेटपटूंची निवृत्ती चांगली नसते, परंतु प्रत्येकाला असेच निवृत्त व्हायला आवडते. तो खूप क्रिकेट खेळू शकला असता, त्याच्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे. पण विराटची शैली नेहमीच अशीच राहिली आहे. मी त्याच्याशी बोलेन पण तो त्याचा निर्णय आहे. मी त्याच्या निर्णयाचे कौतुक करतो.
विराट कोहली के टेस्ट से संन्यास लेने पर राजकुमार शर्मा की भावुक प्रतिक्रिया.. #ViratKohli #TestCricket #India #Retirement #EmotionalMessage #TeamIndia #RajkumarSharma pic.twitter.com/Egi9oI5eSj
— Zee Business (@ZeeBusiness) May 12, 2025
त्याने भारतीय संघाची संपूर्ण संस्कृतीच बदलून टाकली –
विराट कोहलीला भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मान मिळाला आहे, त्याने ६८ पैकी ४० सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. राजकुमार पुढे म्हणाले, “भारतीय संघातील त्याच्या योगदानाला आणि देशासाठी त्याने जे काही केले आहे, त्याला मी सलाम करतो. सर्वांना माहिती आहे की, जेव्हा तो कर्णधार झाला तेव्हा त्याने भारतीय संघाची संपूर्ण संस्कृतीच बदलून टाकली, शारीरिक तंदुरुस्तीपासून ते परदेशात जिंकण्याच्या संस्कृतीपर्यंत. हे खूप मोठे योगदान आहे. त्याची कारकीर्द चमकदार होती. मला त्याचा अभिमान आहे.”
हेही वाचा – Virat Kohli : दिल्लीच्या गल्लीतून कसोटीच्या शिखरापर्यंत पोहोचणाऱ्या विराटच किती झालंय शिक्षण? जाणून घ्या
निवृत्तीवर पुनर्विचार करण्यासाठी संदेशांचा महापूर –
विराटच्या बालपणीचे कोच म्हणाले, कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे आणि या स्टार फलंदाजाला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास भाग पाडण्यासाठी त्यांना संदेशांचा पूर आला आहे. ते म्हणाले, “हा सर्व भारतीयांसाठी खूप भावनिक क्षण आहे. त्याचे चाहते आणि इतर देशवासी मला कोहलीला पटवून देण्यास सांगत आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलावे अशी हजारो विनंत्या आल्या आहेत. तो तुमचे ऐकतो. त्याच्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे. लोक त्यांना प्रेम करतात. ही सर्वात चांगली गोष्ट आहे.”





