IND vs SA : हवेत उडी अन् एका हाताने कॅच; डेवॉल्ड ब्रेव्हिसचा क्षेत्ररक्षण पाहून विराट कोहलीही अवाक्! पाहा VIDEO

Dewald Brevis took stunning catch Ruturaj Gaikwad : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना रांचीत खेळला जात आहे. या सामन्यात द. आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांना सुरुवातीलाच दबावाखाली आणण्याचा त्याचा विचार होता, परंतु विराट-रोहित जोडीने त्यांचे मनसुबे हाणून पाडले. दरम्यान, या सामन्यात डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऋतुराजचा अप्रतिम झेल घेत विराटसह सर्वांचे लक्ष वेधले.
गायकवाडला ब्रेव्हिसने दाखवला माघारचा रस्ता –
रोहित- विराट जोडीन दुसऱ्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. यानंतर रोहित शर्मा 57 धावांवर बाद झाल्यानंतर फॉर्मात असलेला युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड फलंदाजीला आला. त्याची क्षमता आणि अलीकडचा फॉर्म पाहता, टीम इंडियाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्यांची ही अपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस याने एका अविश्वसनीय कॅचमुळे पूर्ण होऊ दिली नाही.
Brevis 🤯🤯#INDvsSA #Ruturaj #ViratKohli pic.twitter.com/4lqAalJgJm
— Moquim Akhter (@m_q____m) November 30, 2025
गायकवाडने बार्टमनच्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने उंच फटका मारला. पहिल्या दृष्टीक्षेपात, चेंडू क्षेत्ररक्षकाजवळून निघून जाईल असे वाटत होते, परंतु ब्रेव्हिसने महान जॉन्टी रोड्सची आठवण करून देत, हवेत एक अविश्वसनीय आणि उंच उडी मारली आणि एका हाताने हा चमत्कारिक झेल पकडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियायवर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे चाहते डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरला मागे टाकत लावली विक्रमांची रांग
कोहलीची प्रतिक्रिया ठरली खास!
ब्रेव्हिसचा हा झेल इतका शानदार होता की नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला विराट कोहलीही पूर्णपणे थक्क झाला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि प्रतिक्रिया स्पष्टपणे सांगत होती की हा झेल किती कठीण आणि खास होता. गायकवाड केवळ 14 चेंडूंमध्ये 8 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे भारतीय डावाची गती काही काळासाठी मंदावली.
दक्षिण आफ्रिकेला 350 धावांचे लक्ष्य –
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावांचा विशाल डोंगर उभा केला. विराट कोहलीच्या (135 धावा) शानदार शतकी खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. कोहलीने 120 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. त्याला कर्णधार केएल राहुलने 56 चेंडूंमध्ये 60 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. रोहित शर्माने 57 धावा जोडल्या, तर रविंद्र जडेजाने अखेरीस 20 चेंडूत 32 धावा करून धावसंख्या वाढवली. दक्षिण आफ्रिकेकडून बर्गर, बॉश, यान्सेन आणि बार्टमन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.





