IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाची घोषणा, पहिल्यांदाच स्मृती मानधना करणार कसोटीl नेतृत्व
IND vs SA : भारतीय संघाचा हा महत्त्वाचा दौरा ९ डिसेंबर रोजी ग्केबेर्हा येथे कसोटीने सुरू होईल. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाईल.

IND vs SA Smriti Mandhana Captain Indian Women South Africa Tour : भारतीय महिला संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून बीसीसीआयने अधिकृत घोषणा केली आहे. या दौऱ्यात मोठा बदल पाहायला मिळत असून अनुभवी सलामीवीर स्मृती मानधनाकडे तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ या दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. स्मृतीच्या नेतृत्वाखाली संघ पहिल्यांदाच कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
कसोटी व एकदिवसीय संघ जाहीर; दीप्ती शर्माकडे उपकर्णधारपद
कसोटी आणि वनडे संघात मंधानासह शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांना स्थान मिळाले आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी ऋचा घोष आणि यास्तिका भाटिया सांभाळतील. अष्टपैलू दीप्ती शर्माकडे या दोन्ही फॉरमॅटचे उपकर्णधारपद दिले आहे. याशिवाय स्नेह राणा, श्री चरणी, क्रांती गौड, नंदिनी शर्मा, जिंतीमणी कलिता आणि महाराष्ट्राची वेगवान गोलंदाज सायली सातघरे संघात आहेत.
टी-२० मध्ये शफाली उपकर्णधार; अनेक युवा चेहऱ्यांना संधी
Say hello to #TeamIndia’s full-time Test Captain, @mandhana_smriti 🫡👏
Send in your wishes for our skipper 👇🤍 https://t.co/lDltrvI8Fy
— BCCI Women (@BCCIWomen) November 9, 2026
टी-२० चे नेतृत्व मानधाना करणार असली तरी शफाली वर्माकडे उपकर्णधारपद सोपवले आहे. संघात निक्की प्रसाद, जी कमलिनी आणि अनुष्का शर्मा या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. जेमिमा, हरमनप्रीत, दीप्ती, ऋचा यांच्यासह गोलंदाजीत रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांती गौड, नंदिनी आणि सायली सातघरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक:
🚨 News 🚨
#TeamIndia squads announced for all-format tour of South Africa 📝 👉
Smriti Mandhana takes charge as full-time Test captain 🙌
Details ▶️ https://t.co/L5jiMKSphi
#SAvIND https://t.co/67NvBjQGiH
— BCCI Women (@BCCIWomen) November 9, 2026
- पहिली कसोटी: ९ डिसेंबर, गेबेर्हा
- पहिला एकदिवसीय सामना: १६ डिसेंबर, पार्
- दुसरा एकदिवसीय सामना: १९ डिसेंबर, केप टाऊन
- तिसरा एकदिवसीय सामना: २२ डिसेंबर, ब्लोमफॉन्टेन
- पहिला टी२० सामना: २६ डिसेंबर, बेनोनी
- दुसरा टी२० सामना: २९ डिसेंबर, पोटचेफस्ट्रूम
- तिसरा टी२० सामना: ३० डिसेंबर, पोटचेफस्ट्रूम





