‘देवमाणूस’ परत येतोय… किरण गायकवाड मुख्यभूमिकेत दिसणार की नाही? चाहत्यांमध्ये संभ्रम

Devmanus 3 Announcement | ‘झी मराठी’ने टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा येण्यासाठी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘देवमाणूस’ या झी मराठीवरील या मालिकेच्या दोन्ही पर्वांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. आता ‘देवमाणूस’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबची घोषणा वाहिनीकडून करण्यात आली. मालिकेची निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदेनेही या नव्या पर्वाविषयी खास पोस्ट शेअर केली. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे.
किरणने ‘देवमाणूस ३’चा टीजर शेअर करत असे लिहिले की, ‘आता या देवमाणसाचं स्वागत करा… तो येतोय भेटायला. ‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी, ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस – लवकरच… आपल्या झी मराठीवर!’ किरणने स्वत: पोस्ट शेअर करत ‘या देवमाणसाचं स्वागत करा’ असे म्हटले आहे.
पहिल्या टीझरमध्ये अभिनेत्याची फक्त सावली प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा किरण गायकवाड कमबॅक करणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, आता ‘देवमाणूस’ मालिका केव्हा सुरू होणार? मुख्य भूमिकेत कोण झळकणार याची घोषणा ‘झी मराठी’कडून लवकरच करण्यात येणार आहे.
&
View this post on Instagram
झी मराठी वाहिनीवर ३१ ऑगस्ट २०२० रोजी ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू झाली होती. खेड्यातील एका डॉक्टरला लोकांनी देव मानले होते, पण त्याने या गोष्टीचा कसा क्रूरपणे फायदा घेतला असे कथानक या मालिकेत दाखवण्यात आलेले. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला.
तर १० सप्टेंबर २०२२ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरीही या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. ‘देवमाणूस’च्या आधीच्या पर्वांमध्ये ही भूमिका किरण गायकवाड या अभिनेत्याने गाजवली. ‘देवमाणूस’ टीआरपीच्या शर्यतीमध्येही कायम पुढे राहिलेली मालिका होती. आता नव्या पर्वातही मालिकेला मोठे यश मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
‘ओवैसी औरंगजेबाचे भक्त, त्यांच्यावर कारवाई…’; रणजित सावरकरांचा असदुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल





