‘ओवैसी औरंगजेबाचे भक्त, त्यांच्यावर कारवाई…’; रणजित सावरकरांचा असदुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल

Ranjit Savarkar on Owaisi । वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. एका वृत्तसंस्थेशी बोलताना रणजित सावरकर यांनी ओवेसींची तुलना कुत्र्याशी केली आणि त्यांना लबाड आणि देशद्रोही म्हटले. त्याच वेळी, तुषार गांधींबद्दल ते समाजवादी पक्षाचे प्रचारक आहेत आणि त्यांची इतिहासाची समज खूपच कमकुवत आहे.” असे म्हटले.
ओवैसी यांनी वीर सावरकरांबद्दल काही वादग्रस्त विधाने केली होती, ज्यावर रणजित सावरकर यांनी,”ओवैसी हा एक नंबरचा लबाड माणूस आहे. तो मुद्दाम खोटे बोलतो. जो माणूस औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नमन करतो त्याला वीर सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. ओवैसींवर आरोप करत त्यांनी म्हटले की, “ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम करतात आणि त्यांचे वडील आणि आजोबाही हेच काम करत आहेत”. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. पुढे बोलताना त्यांनी, ओवैसींच्या पक्षाचे उद्दिष्ट हिंदू-मुस्लिम फूट पाडणे आहे, जे देशासाठी धोकादायक आहे.” असे म्हटले.
‘ओवैसी औरंगजेबाचा भक्त आहे’ Ranjit Savarkar on Owaisi ।
रणजित सावरकर पुढे म्हणाले की, ओवैसी हा औरंगजेबाचा भक्त आहे आणि तो त्याच्या पक्षाच्या माध्यमातून मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा कट रचतो. सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा. ओवेसी यांचे कुटुंब देशद्रोहाच्या परंपरेशी जोडलेले असल्याने त्यांना त्यांच्यावर भाष्य करायचे नाही.
रणजित सावरकर तुषार गांधींबद्दल काय म्हणाले होते? Ranjit Savarkar on Owaisi ।
त्याच वेळी, तुषार गांधींवर शाब्दिक हल्ला करताना त्यांनी म्हटले की. ते फक्त समाजवादी पक्षाचे प्रचारक आहेत. त्यांचे काम देशाला आग लावणे आहे. तुषार गांधींना दुसरे कोणतेही काम नाही. त्यांना महात्मा गांधींच्या हत्येचा इतिहासही माहित नाही. महात्मा गांधींची हत्या तीन जणांनी केली होती, पण तुषार गांधींना कदाचित हे माहितही नसेल. रणजित सावरकर यांनी तुषार गांधींविषयी,”त्यांचे विधान केवळ त्यांच्या स्वार्थासाठी दिले गेले आहे आणि त्यामुळे देशात द्वेष आणि हिंसाचार पसरू शकतो” असे म्हटले आहे.
पुढे रणजित सावरकर यांनी, तुषार गांधींसारखे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात समस्या निर्माण करत आहेत आणि देशाबद्दल काहीही विचार करत नाहीत. त्यांचे ध्येय फक्त गांधींचे नाव पुढे चालवणे आहे. तुषार गांधी यांनी इतिहासाची योग्य माहिती मिळवावी आणि समाजात केवळ कलह आणि असंतोष निर्माण करणारे वक्तृत्व टाळावे.” असा सल्ला देखील त्यांनी दिला. रणजित सावरकर यांनी ओवेसी आणि तुषार गांधी दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. ते म्हणाले की, “समाजात शांतता नांदावी म्हणून सरकारने तुषार गांधी आणि ओवैसी दोघांविरुद्ध ठोस पावले उचलावीत.”





