मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे हे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. जवळपास तीन दशकांच्या त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी कधीच एकत्र काम केले नव्हते मात्र आता ते एका चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. हे दोघेजण ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तेजस प्रभा विजय देवस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी आतापर्यंत माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंग सोबत छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ‘देवमाणूस’ चित्रपटात दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कलाकारांचे जबरदस्त अभिनय कौशल्य या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक मेजवानीच ठरणार आहे.