पुणे, मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा देवेंद्र फडणवीसांकडून आढावा ; प्रशासनाला सतर्कतेचा इशारा

Devendra Fadnavis on rain । राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यासह मुंबईत देखील पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतरही भागात असलेल्या पावसाच्या स्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. तसेच प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात एनडीआरएफच्या 2 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील एकतानगर भागात 11 बोटींनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनातील सर्व चमूंना सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.





