Devendra fadnavis On Uddhav thackeray: ‘उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला..’; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Devendra fadnavis On Uddhav thackeray – उद्धव ठाकरे हे निराश झाले असून त्या निराशेतून अशी विधाने करत आहे. तसेच निराश झाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने अशा व्यक्तींना उत्तर काय देणार? असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अहमद शाह अब्दालीचे वंशज आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील मेळाव्यात केली.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे प्रचंड फर्स्टेट झाले आहेत त्यातूनच ते असं बोलत आहेत. नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत निराशेत आहेत. त्या निराशेतून ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत त्यावर आपण काय उत्तर द्यायचं? फर्स्टेशनमध्ये जो माणूस डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्याला उत्तर द्यायचं नव्हतं.
मात्र आजचं भाषण करुन उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं जे अमित शहा म्हणाले होते. अमित शहा त्यांच्याबद्दल म्हणाले होते की ते औरंगजेब फॅन क्लबचेच सदस्य आहेत. आज उद्धव ठाकरेंनी भाषण करुन ते दाखवून दिले.
सचिन वाझेची प्रतिक्रिया मी पाहिली, त्याने मला पत्र पाठवले हेदेखील मी बातमी पाहिली आहे. हे सगळे पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन. जे काही समोर येतं आहे त्यासंदर्भात आम्ही योग्य चौकशी करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, पाहा….
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आता लढाई मैदानात आहे, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय.
पण, ढेकणांना आव्हान द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं. मी आव्हान द्यावं इतका मोठा तू नाहीस. काहीजणांना वाटलं की मी त्याला आव्हान दिलेय. तर हे आव्हान चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय.
तसेच, “मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे, मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्यांचा पक्ष,” असे म्हणत भाजपवरही निशाणा साधला.




