राज ठाकरेंना सरकारमध्ये स्थान मिळणार की नाही? ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis on Raj Thackeray । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि विभागांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, महायुतीचे मित्रपक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काय मिळणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
मनसेविषयीचा सॉफ्ट कॉर्नर कायम Devendra Fadnavis on Raj Thackeray ।
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंविरोधात लढूनही चांगली मते मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या अनेक उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. त्यांची आणि आमची मते बऱ्याच प्रमाणात जुळतात. त्यांना सरकारमध्ये आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसेविषयीचा सॉफ्ट कॉर्नर कायम असल्याचे दिसून आले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी,”लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला खुल्या दिलाने बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदाही झाला. पण विधानसभा निवडणुकीत आम्हाला राज ठाकरे यांची अडचण लक्षात आली. त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न हाच होता की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात आहे. पण त्यांच्या लोकांनी निवडणूक लढवलीच नाही तर तो पक्ष कसा चालणार? आमच्याकडेही त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ती वस्तुस्थिती समजून घेत राज ठाकरे यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढून त्यांना चांगली मतं मिळाली, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिकडे राज ठाकरे यांच्या पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धारावी पुनर्वसन योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य Devendra Fadnavis on Raj Thackeray ।
धारावी पुनर्वसन योजनेत 2011 पर्यंतच्या रहिवाशांना आपण धारावीतच घरं देणार आहोत. धारावी पुनर्वसन योजनेचा आराखडा महाविकास आघाडी सरकारनेच तयार केला आहे. मी फक्त त्यामध्ये टीडीआरसंदर्भातील नियमात बदल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार जे नियमात बसत नाहीत त्यांना भाड्याने घरे देण्यात येतील. या घरांमध्ये ते 11-12 वर्षे राहिले की त्यांना थोडे पैसे भरुन संबंधित घर देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा
“शाब्बास! ५ तारखेला शपथ विधी आणि ५ तारखेला १००० कोटीची ऑर्डर?” ; अंजली दमानिया यांचे टीकास्त्र





