Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंच्या भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले….

मुंबई : त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. वरळीमधील डोम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही बंधू 19 वर्षानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळालं. या मेळाव्यात दोन्ही बंधूनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘मी राज ठाकरे यांचा आभारी आहे. दोन बंधूंना एकत्र आणण्याचं श्रेय मला दिलं, श्रध्देय बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. हा विजय मेळावा होता असं सांगितलं होतं, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण झालं. मराठी भाषेबद्दल बोलणं झालं नाही. आमचं सरकार पाडलं, आम्हाला निवडून द्या अशी भाषणं झाली. हा मराठीचा विजय उत्सव नव्हता हा रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन तिथे घेतलं आहे. मुळात त्यांना २५ वर्ष महापालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यासारखं काही काम करू शकले नाही’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





