Raj Thackeray : मराठी मेळाव्यानंतर राज ठाकरेंचे पहिलं ट्विट; दिलगिरी व्यक्त करत म्हणाले…

मुंबई : त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. वरळीमधील डोम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही बंधू 19 वर्षानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळालं. या ऐतिहासिक मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलं ट्विट केले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले ट्विटमध्ये?
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार मानले. तसेच मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 5, 2025
या मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या मेळाव्यातून दोन्ही ठाकरे बंधूनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.





