Devendra Fadnavis : मोठी घडामोड..! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
Devendra Fadnavis : दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या वाढत्या प्रचंड दबावानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Devendra Fadnavis : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या वाढत्या दबावानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर देशाच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने तातडीने दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे. (Devendra Fadnavis)
त्यामुळे राजधानीतील या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने 20 जुलै रोजी जंतर-मंतर येथे निर्णायक वळण घेतले. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. (Devendra Fadnavis)
काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही. अखेर या वाढत्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. (Devendra Fadnavis)
या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजा पार पाडल्यानंतर ते दुपारी सोलापूरहून दिल्लीला रवाना झाले. फडणवीस यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी बोलावण्यात आले आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Devendra Fadnavis)
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी रविवारी मुंबईत तिरंगा मोर्चाचे आयोजन केले असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Devendra Fadnavis)





