मुंबई : कुणालाही भाषेच्या आधारावर् मारहाण करणे योग्य नाही. महाराष्ट्रात तुम्ही राहात असाल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे, हा आग्रह ठीक आहे, मात्र याचा दुराग्रह होणे अपेक्षित आहे. तुम्ही मराठी बोलत नाहीत, यासाठी कुणाला मारहाण करु शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्यदेखील चुकीचे असल्याचे म्हटले. मराठी बोलता येत नाही म्हणून मारहाण झाल्याच्या दोन-तीन घटना निश्चित झाल्या आहेत. जो घटना करणार त्याच्यावर आमचे सरकार कारवाई करणार. मी आधी हे सांगतो की, महाराष्ट्रात मराठी शिकण्याची सक्ती आहे. आम्ही ती सक्तीची केली आहे. त्याबाबत आमचे कोणतेही कॉम्प्रमाईज नाही. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे असा आग्रह करणे चुकीचे नाही. पण कुणी मराठी बोलू शकत नाही तर त्याला तुम्ही मारणार हे आमच्या सरकारला मंजूर नाही. असे जो करणार त्यावर आम्ही कारवाई करणार म्हणजे करणार”, असे देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले. नितेश राणे जे बोलले ते चुकीचे आहे. त्यांना खरंतर वेगळे बोलायचे होते. त्यांचे म्हणणे होते की, तुम्ही मराठी येत नाही म्हणून हिंदूंना मारत आहेत. इतर लोकं देखील आहेत ज्यांना मराठी बोलत नाहीत त्यांना का मारत नाहीत? नितेश राणे जे बोलले ते एकप्रकारे बरोबर आहे आणि दुसरीकडे चुकीचे देखील आहे. केवळ भाषेच्या आधारावर किंवा कोणत्या धर्माची लोक ही भाषा बोलत नाहीत या आधारावर हे डिस्क्रिमिनेट होऊ शकत नाही. हे चुकीचे आहे. त्यामुळे अशा भाषेचा वापर व्हायला नको”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.