Tiger Shroff : सुपारीच्या पैशांच्या व्यवहारांचा तपशील उघड; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलीस तपासाला वेग
गोळीबाराची घटना घडवण्यासाठी वापरण्यात आलेले पैसे विविध खात्यांमार्फत हस्तांतरित करण्यात आले होते. गुन्हे शाखा आता ही सर्व बँक खाती आणि व्यवहार जोडून संपूर्ण आर्थिक जाळ्याचा तपास करत

Tiger Shroff – टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात आता सुपारीच्या पैशांच्या व्यवहारांचा तपशील समोर आला आहे. हरियाणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी अमनच्या बँक खात्यात सुपारीचे पैसे जमा करण्यात आले होते.
अमन हा हरियाणामधील रोहाना गावचा रहिवासी आहे. सुपारीचे पैसे थेट त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला खरखोडा येथे अटक केली.
या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या 12 झाली आहे. रोहाना येथील दुसरा आरोपी कुणाल संजयने अमनच्या खात्यात सुपारीचे पैसे जमा केले होते. पोलिसांच्या तपासात इतर अनेक बँक खात्यांमधून प्रत्येकी 5 हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे.
यामुळे पोलिसांना संशय आहे की, गोळीबाराची घटना घडवण्यासाठी वापरण्यात आलेले पैसे विविध खात्यांमार्फत हस्तांतरित करण्यात आले होते. गुन्हे शाखा आता ही सर्व बँक खाती आणि व्यवहार जोडून संपूर्ण आर्थिक जाळ्याचा तपास करत
आहे.दरम्यान, विशेष मकोका न्यायालयाने या प्रकरणात अटक केलेल्या उर्वरित 11 आरोपींना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मकोका लागू झाल्यापासून या प्रकरणातील ही पहिलीच रिमांड सुनावणी होती.






