Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
Updated On:

Pune News : आज १ अॅागस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती असून शहरातील स्वारगेट परिसरातील सारसबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजनाची जय्यती तयार करण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथे असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पुण्यातील सारसबाग येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत, अभिवादन केलं. आज अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्य, लोककला, सामाजिक परिवर्तन व संयुक्त महाराष्ट्र चळवळ अश्या विविध क्षेत्रांतील अतुलनीय कार्याचं स्मरण करत,… pic.twitter.com/JlQVGkYh3F
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 1, 2025





