Suraj Chavan : सूरज चव्हाण याच्यासाठी अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पुणे : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सुरज चव्हाणने बाजी मारली. बिग बॉसच्या या सिझनने जवळजवळ सगळे रेकॉर्ड मोडले. या सिझनमध्ये एकपेक्षा एक कलाकार होते. सूरज चव्हाण हा तुटकी चप्पल आणि दोन जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. सुरूवातीपासूनच सूरजचा अंदाज प्रेक्षकांना जबरदस्त आवडला होता.
सूरज हा मुळ बारामतील जिल्हातील आहे. सूरज विजेता झाल्यानंतर अनेक राजकिय लोकांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. आज सुरज चव्हाण याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा देखील झाली. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून सूरज चव्हाण याचा सत्कार करण्यात आला.
अजित पवारांनी केली घोषणा
सूरज चव्हाण याच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही आहे. बिग बॉसच्या घरात असताना याबद्दल अनेकदा त्याने हे बोलून दाखवले. यानंतर आजच्या भेटीदरम्यान अजित पवारांनी मोठी घोषणा करत सूरजला एकदम चांगले घर बांधून देणार असल्याचे जाहीर केले आहे.





