उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हवेलीकरांकडून सत्कार

वाघोली – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल हवेली तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जयेश विलास कंद व इतर मान्यवर यांच्या हस्ते पवार यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
याबाबत मुंबई येथे जयेश विलास कंद मित्रपरिवाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत निवडीबद्दल व कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन केले.
याबाबतीत जयेश कंद यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहकारातील अनुभव तसेच काम करण्याची हातोटी ही प्रत्येक संस्था व प्रशासन यांच्यावर लोकाभिमुख निर्णय घेण्यास उपयुक्त ठरते. उपमुख्यमंत्र्यांची भेट ही कार्यकर्त्यांसाठी काम करण्याची अनोखी ऊर्जा असल्याचे कंद यांनी सांगितले.
हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयेश विलास कंद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे खासदार सुनेत्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.





