पुण्यात डेंग्यूचा विळखा घट्ट…

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – सततच्या पावसाने अनेक सोसायट्या तसेच खासगी आस्थापनांमध्ये टेरेस अथवा परिसरात साचलेल्या कचऱ्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे शहरात डेंग्यू रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर, डासोत्पतीची ठिकाणे आढळल्याने महापालिका प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांत सुमारे 1,600 जणांना नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 7 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
शहरात जून ते 8 ऑगस्ट अखेरपर्यंत डेंग्यूचे 1,151 संशयित रुग्ण आढळून आले असून, 87 जणांना डेंग्यूची लागण झालेली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शहरात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे महापालिकेकडून यावर्षी पावसाळा सुरू होताच खबरदारीचा उपाय म्हणून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तपासणी पथके तयार करून ज्या भागात डेंग्यूचा रुग्ण आढळून येत आहे. त्या भागातील संशयित घरांची तपासणी केली जात आहे. नोटीस पाठवलेल्यांमध्ये टेरेस तसेच गॅलरीत असलेल्या कचऱ्यात पाणीसाठून डासांची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे.
सततच्या पावसाने वाढताहेत डास उत्पत्ती ठिकाणे ! पालिकेकडून आतापर्यंत 1,600 जणांना नोटीस
महिनासंशयितबाधित
जून15417
जुलै74662





