कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

पवन मावळ : उर्से येथे कृषीदिनानिमित्त कृषीकन्यांच्या माध्यमातून भात व सोयाबीनच्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हा उपक्रम कृषी विभाग व डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला. मार्गदर्शन करताना नवीन बोराडे यांनी रासायनिक व सेंद्रिय बीजप्रक्रियेचे महत्त्व विशद केले.
थायरम, ट्रायकोडर्मा, गोमूत्र, तसेच चारसूत्री, एसआरटी व अभिनव पद्धत लागवड यासारख्या सुधारित तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. प्रमिला भोसले यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. या उपक्रमामुळे शेती उत्पादनात वाढ व तंत्रज्ञान आधारित शेतीप्रती शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली असून, ग्रामीण पातळीवर कृषीदिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत राबवलेल्या या कार्यक्रमात कृषीकन्या अमृता चांडोले, एकता ढवळे, श्रुती कोपनर, जान्हवी कुपेकर, अनोघा मेश्राम, असदा मुल्ला यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस. एन. पाटील, व्ही. बी. घोलप व महाविद्यालयातील प्राध्यापक, तसेच उपकृषी अधिकारी नवीनचंद्र बोराडे, विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला भोसले, सरपंच भारती गावडे, प्रगतशील शेतकरी जालिंदर व सुभाष धामणकर, भारत ठाकूर, पोलीस पाटील गुलाब आंबेकर, चेअरमन मधुकर सावंत आदी मान्यवर तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





