Pimpri : कृषीकन्यांकडून कृषी मेळावा, चर्चासत्र

पवन मावळ : मावळ तालुक्यातील मौजे बेबडडोहळ येथे डॉ.डी .वाय.पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषीकन्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत बेबड ओहळ ग्रामपंचायत येथे ‘कृषी मेळावा व चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.
सदर मेळाव्यास उपकृषि अधिकारी नवीन बोराडे यांनी शेतकऱ्यांना खरीप पिके उत्पादकता वाढविण्याच्या विविध उपाययोजना तसेच उपकृषि अधिकारी विकास गोसावी यांनी शेती व शेतीसंलग्न कृषी व्यवसायाशी निगडितकृषि विभागाच्या शासकीय योजना आणि सहाय्यक कृषि अधिकारी अश्विनी खंडागळे यांनी भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी चारसुत्री पद्धतीने लागवड व युरिया ब्रिकेट वापर बाबत मार्गदर्शन केले .चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले व त्यावर कृषि अधिकाऱ्यांनी उत्तम उपाययोजना सुचवून शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.
बेबेडडोहळ येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यास बेबडडोहळ ग्रामपंचायत सरपंच सौ तेजल राकेश घारे, उपसरपंच सौ ज्योती गोरख घारे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. टी. बी. देवकाते व डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस. एन. पाटील आणि कृषी व्यवसाय तज्ञ ए. एम. कदम, एस. आर. बेनके, व्ही. बी. घोलप, एच. एस.चिरमुरे, बी. के. चव्हाण, व्ही.डी.दरंदले उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कृषीकन्या व ग्रामस्थांनी केले.





