‘इंडिया गेट’चं नाव बदलण्याची मागणी; भाजप नेत्याने मोदींना पत्र लिहीत नावही सुचवले

India Gate | राजधानी दिल्ली येथील ‘इंडिया गेट’चं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. इंडिया गेटचे नाव बदलून ‘भारत माता द्वार’ असे म्हटले आहे. हीच भारतातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं त्यांनी सांगितलं आहे.
जमाल सिद्दीकी यांनी पत्रात नेमकं काय लिहिले ?
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “तुमच्या नेतृत्वाखाली देशातील 140 कोटी भारतीय बंधू-भगिनींच्या मनात देशभक्ती आणि समर्पणाची भावना आहे. भारत आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे. तुमच्या कार्यकाळात मुघल आक्रमक आणि लुटारू इंग्रजांनी केलेल्या जखमा भरून आल्या आहेत. गुलामगिरीचा डाग तुम्ही धुवून काढला. त्यामुळे संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण आहे.” India Gate |
पुढे त्यांनी लिहिले की, “तुमच्या कार्यकाळात मुघल सम्राट औरंगजेबाच्या नावावर असलेल्या रस्त्याचे नाव बदलून ए.पी.जे. कलाम रोड असे करण्यात आले होते. त्याच धर्तीवर इंडिया गेटवरील किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते हटवण्यात आला होता. ज्याप्रमाणे तुम्ही राजपथाचे नाव दत्त पथ असे ठेवले त्याचप्रमाणे इंडिया गेटचे नाव बदलून ‘भारत माता द्वार’ केले पाहिजे.” India Gate |
BJP Minority Wing’s national chief Jamal Siddiqui writes to Prime Minister Narendra Modi, requesting that India Gate in Delhi be renamed as Bharat Mata Dwar.
(Source of the letter: Jamal Siddiqui) pic.twitter.com/RDmA1wSch7
— ANI (@ANI) January 6, 2025
“इंडिया गेटचे भारत मातेत रूपांतर करणे हीच त्या स्तंभावर कोरलेल्या हजारो शहीद देशभक्तांच्या नावांना खरी श्रद्धांजली ठरेल. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या प्रस्तावावर विचार करा आणि इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार ठेवा,” अशी मागणी जमाल सिद्दीकी यांनी केली आहे. यावर आता काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. India Gate |
इंडिया गेटचंन महत्त्व जाणून घ्या…
इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. इंडिया गेटची रचना सर एडविन लुटियन्स यांनी केली होती. याचे बांधकाम 1921 मध्ये सुरू झाले आणि 1931 मध्ये पूर्ण झाले. 1914 ते 1921 याकाळात झालेले पहिल्या महायुद्धात आणि अफगाण युद्धात शहीद झालेल्या 84,000 भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी 1931 रोजी तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी इंडिया गेटचे उद्घाटन केले.
इंडिया गेट 42 मीटर उंच आणि वाळूच्या दगडापासून बनवलेले आहे. त्याची वास्तुकला इंडो-युरोपियन शैलीचे उदाहरण आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर शहीद जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेटच्या खाली प्रज्वलित करण्यात आली. भारतीय सैनिकांच्या शौर्याचा गौरव करणारे राष्ट्रीय युद्ध स्मारक इंडिया गेटजवळ बांधण्यात आले आहे. इंडिया गेट हे भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, जे देशभक्ती आणि त्यागाची भावना दर्शवते.
हेही वाचा:
“लोकांनी दिलेलं मत आपल्यासाठी कर्ज…” ; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया





