“लोकांनी दिलेलं मत आपल्यासाठी कर्ज…” ; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar। उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. अशातच त्यांनी काल एका कार्यक्रमात तुम्ही मला मत दिले म्हणजे तुम्ही माझे मालक होत नाही असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता भाजपकडून प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याविषयी बोलताना, अजित पवार नेमकं काय बोलले हे अजून मी पहिले नाही परंतु ज्याप्रकारे सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे त्यावरून मी अंदाज लावू शकतो. तसेच जनता ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्यांचे कल्याण हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यांच्यामुळेच आमचे सरकार पुन्हा एकदा स्थापन झाले आहे.जनतेचे मत हे आमच्यावर एक प्रकारचे कर्ज आहे.” असे म्हणत त्यांनी अजित पवारांचे वक्तव्य खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
‘कोणतीही तडजोड करणार नाही’ Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar।
यासोबतच त्यांनी आपली कटिबद्धता व्यक्त करत आम्ही राज्यातील जनतेला जी काही आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण बांधिलकीने काम करू असे सांगितले. आश्वासने पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.
मला मत देऊन तुम्ही माझे मालक झाला नाही Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar।
विशेष म्हणजे रविवारी अजित पवार साबरमती विधानसभा मतदारसंघातील एका मंचावर कार्यकर्त्यांसोबत होते. त्यावेळी भरसभेत अजित पवार म्हणाले होते, “तुम्ही मला मत दिले म्हणजे तुम्ही माझे मालक झालात असे अजिबात नाही.”त्यांच्या याच विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.





