मास्कवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी
Updated On:

नवी दिल्ली – देशात सध्या 20 कोटी एन-95 प्रकारचे मास्क निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र, फक्त 50 लाख मास्क निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मास्क उत्पादकांचे नुकसान होत आहे. यासाठी मास्कच्या निर्यातीवरील बंदी उठवावी, अशी मागणी अखिल भारतीय मास्क निर्मात्या संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. निर्यात केल्यानंतर मास्क उत्पादकांना फायदा होऊ शकेल.





