Abhishek Sharma Court : क्रिकेटर अभिषेक शर्माच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही! दिल्ली हायकोर्टाच्या ‘या’ आदेशाने इंटरनेट जगतात उडाली खळबळ
Abhishek Sharma Court : अभिषेक शर्मा याच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

Abhishek Sharma Personality Rights Delhi High Court Order Meta Amazon Flipkart Deepfake : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचे (Personality Rights) रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाने विविध सोशल मीडिया अकाऊंट्स, ऑनलाईन विक्रेते आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना अभिषेक शर्माच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो, आवाज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा व्यावसायिक वापर करण्यास स्पष्ट शब्दांत मनाई केली आहे. (Abhishek Sharma Court)
एआय आणि डीपफेक कंटेंटवर न्यायालयाची कडक नजर! (Abhishek Sharma Court)
अभिषेक शर्माने दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये त्याने आरोप केला होता की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनवलेले त्याचे फोटो, डीपफेक (Deepfake) व्हिडीओ आणि मॉर्फ केलेले चुकीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत.
यामुळे समाजात त्याची प्रतिमा डागाळत असून त्याच्या लोकप्रियतेचे नुकसान होत आहे. यावर सुनावणी करताना जस्टिस ज्योती सिंग म्हणाल्या, “अभिषेक शर्माने स्वतःच्या मेहनतीने आणि खेळाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे कोणालाही त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या नावाचा किंवा प्रतिमेचा व्यावसायिक गैरवापर करता येणार नाही.”
🔴 ABHISHEK SHARMA TAKES LEGAL ACTION OVER AI FAKE POSTS🤯
– Abhishek has moved the Delhi High Court against fake AI-generated posts & images spreading false rumours about him on social media. The court acknowledged the misuse of AI and will hear the case further.[Ndtv] pic.twitter.com/jFQ01nrOX7
— Sam (@cricsam02) July 13, 2026
मेटा, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला ३६ तासांचा अल्टीमेटम! ( Abhishek Sharma Court)
याचिकाकर्त्याने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, अनेक ऑनलाईन विक्रेते अभिषेक शर्माचे नाव आणि फोटो वापरून टी-शर्ट, टीम जर्सी, पोस्टर्स आणि फोटो फ्रेम्स बेकायदेशीरपणे विकत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये असा गैरसमज निर्माण होत आहे की, या उत्पादनांचे समर्थन स्वतः अभिषेक शर्मा करत आहे.
हेही वाचा – ICC Big Decision : आयसीसीचा झटका! ‘या’ 2 संघाबाबत घेतला मोठा निर्णय
याची गंभीर दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने मेटा (फेसबुक/इन्स्टाग्राम), ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या दिग्गज कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३६ तासांच्या आत अभिषेक शर्माच्या नावे अनधिकृतपणे चालणारे सर्व लिंक्स, वस्तू आणि डीपफेक कंटेंट तात्काळ इंटरनेटवरून हटवण्यात यावेत. (Abhishek Sharma Court)





