Yastika Lords Century : लॉर्ड्सवर भारतीय रणरागिणीचा ऐतिहासिक डंका! यास्तिका भाटियाने पहिलंवहिलं शतक झळकावत केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’
Yastika Lords Century : भारताची २५ वर्षीय स्टार विकेटकीपर-फलंदाज यास्तिका भाटियाने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून नवा इतिहास लिहिला आहे.

Yastika Bhatia Century IND vs ENG Womens Lords Test 2026 : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला आहे. भारताची २५ वर्षीय स्टार विकेटकीपर-फलंदाज यास्तिका भाटियाने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून नवा इतिहास लिहिला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारी ती जगातील पहिलीच फलंदाज ठरली आहे.यास्तिकाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी १४५ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. हे तिच्या कसोटी कारकिर्दीतीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक आहे.
पहिल्याच चेंडूवर मिळाले होते जीवदान –
तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या यास्तिकाला पहिल्याच चेंडूवर नशिबाची मोठी साथ मिळाली. इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेलचा एक इन-स्विंग चेंडू थेट यास्तिकाच्या ऑफ-स्टंपवर जाऊन आदळला. मात्र, चेंडू लागूनही स्टंपवरील बेल्स खाली पडल्या नाहीत आणि यास्तिका बोल्ड होता-होता वाचली. या मोठ्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत यास्तिकाने त्यानंतर एकही चूक केली नाही. तिने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मेळ घालत १५८ चेंडूंत १४ चौकारांसह ११३ धावांची ऐतिहासिक खेळी केली. अखेर ७३ व्या षटकात सोफी एक्लेस्टोनने तिला बाद केले.
Lord’s rises to applaud a special performance 🙌👏
Yastika Bhatia walks back after a historic 1️⃣1️⃣3️⃣(158) 💯
Updates ▶️ https://t.co/O1rEau8j8n #TeamIndia | #ENGvIND | @YastikaBhatia pic.twitter.com/duNLbKE6NC
— BCCI Women (@BCCIWomen) July 12, 2026
Tea on Day 3️⃣ 🫖
Another solid batting effort means that #TeamIndia set England a target of 4️⃣5️⃣7️⃣ runs 🎯
Over to our bowlers! 👌
Scorecard ▶️ https://t.co/O1rEau8j8n #ENGvIND pic.twitter.com/MuSChWBIks
— BCCI Women (@BCCIWomen) July 12, 2026
क्रांती गौडनंतर यास्तिकाने रचा इतिहास; ऑनर्स बोर्डवर वर्चस्व!
Kranti Gaud- First woman cricketer to claim a 5-wicket haul at Lord’s in Tests ✅
Yastika Bhatia- First woman cricketer to score a century at Lord’s in Test cricket ✅
India Women’s team have taken charge at Lord’s Test! 🇮🇳🔥 #KrantiGaud #YastikaBhatia #ENGWvsINDW… pic.twitter.com/8hEuAnijsh
— CREX (@Crex_live) July 12, 2026
या ऐतिहासिक कसोटीत भारतीय महिला खेळाडूंनी लॉर्ड्सचा ‘ऑनर्स बोर्ड’ गाजवला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने इंग्लंडच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेऊन ऑनर्स बोर्डवर स्थान मिळवले होते. त्यानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी यास्तिकाने शतकी मोहर उमटवली. दोन दिवसांत दोन भारतीय महिलांनी लॉर्ड्सच्या बोर्डावर नाव कोरण्याची ही पहिलीच अभूतपूर्व वेळ आहे.
यास्तिकाच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या डावात ३०० हून अधिक धावा कुटल्या असून, भारताची एकूण आघाडी ४०० धावांच्या पार गेली आहे. यामुळे या ऐतिहासिक कसोटीवर भारताने आपली पकड मजबूत केली आहे.





