Doeschate Quits Coach : टीम इंडियाच्या गोटात मोठी खळबळ! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदार सोडणार टीम इंडियाची साथ
Doeschate Quits Coach : . आता मैदानाबाहेरील एका मोठ्या घडामोडीमुळे बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा ताण प्रचंड वाढला आहे.

Ryan ten Doeschate Resigns as Team India Assistant Coach : इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिकेतील दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता मैदानाबाहेरील एका मोठ्या घडामोडीमुळे बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा ताण प्रचंड वाढला आहे. भारतीय संघाचे फील्डिंग कोच टी. दिलीप यांच्यानंतर आता असिस्टंट कोच रायन टेन डोएशेट यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संदर्भात बीसीसीआयला अधिकृतपणे कळवले असून आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.
१९ जुलै हा डोएशेटचा शेवटचा दिवस? (Doeschate Quits Coach)
‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, जर बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी डोएशेटच्या विनंतीला मंजुरी दिली, तर १९ जुलै २०२६ हा त्यांचा टीम इंडियासोबतचा शेवटचा दिवस असेल. याच दिवशी भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. नेदरलँड्सच्या या माजी स्टार क्रिकेटपटूला गौतम गंभीर स्वतः भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये घेऊन आले होते. यापूर्वी या दोघांनी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये एकत्र काम केले असून गंभीरचा डोएशेटवर प्रचंड विश्वास आहे.
राजीनाम्यामागे कौटुंबिक कारण! (Doeschate Quits Coach)
🚨 REPORTS 🚨
The England ODI series could be Ryan ten Doeschate’s final stint as part of the Indian coaching setup! 🇮🇳🏏
He has already informed the BCCI that he wants to move on and has requested to be relieved due to personal reasons. 🗣️
(Source: Cricbuzz)#ENGvIND #ODIs… pic.twitter.com/06RCrCMXsG
— Sportskeeda (@Sportskeeda) July 14, 2026
डोएशेटने अचानक संघ सोडण्यामागे कौटुंबिक कारण असल्याचे सांगितले आहे. अहवालानुसार, डोएशेट यांना तीन लहान मुले असून त्यांची पत्नीही नोकरी करते. त्यांचे संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये राहते, तर डोएशेट यांना प्रशिक्षकपदामुळे बहुतांश वेळ भारतात किंवा दौऱ्यांवर घालवावा लागतो. सततच्या प्रवासामुळे ते आपल्या कुटुंबाला आणि मुलांना वेळ देऊ शकत नाहीये. त्यामुळे आता ते कमी प्रवास करावा लागेल अशी नोकरी शोधत आहे. डोएशेट जुलै २०२४ मध्ये टीम इंडियासोबत जोडले गेले होते आणि त्यांचा २ वर्षांचा प्रारंभिक करार आता पूर्ण झाला आहे.
गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील दुसरी मोठी गळती! (Doeschate Quits Coach)
डोएशेट यांनी संघ सोडल्यास गंभीरच्या कोचिंग स्टाफमधून बाहेर पडणारे ते दुसरे मोठे सदस्य ठरतील. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे अभिषेक नायरला पदावरून हटवण्यात आले होते आणि त्याच्या जागी सितांशु कोटक यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता डोएशेट पाठोपाठ २०२१ पासून संघासोबत असलेले फील्डिंग कोच टी. दिलीप यांनीही निवृत्तीचे संकेत दिल्याने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवीन कोचिंग स्टाफ शोधावा लागणार आहे.





